मोदी सरकारचा 'दे धक्का'; विनाअनुदानित सिलिंडर महागला

मंगळवार, 1 जुलै 2014 (17:26 IST)
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर ‘अच्छे दिन’च्या प्रतिक्षेत असलेल्या जनतेला आता ‘बुरे दिन’ पाहावे लागत आहेत. मोदी सरकारने आणखी एक धक्का दिला आहे. आधी रेल्ले भाडेवाढ, त्यानंतर पेट्रोलच्या दरात वाढ आणि आता विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ केलीआहे.

'अच्छे दिन आने वाले है' असे सांगून मते मागणार्‍या भाजप नेत्यांनी देशातील जनतेची घोरनिराशा केली आहे.

विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 16.50 रुपयांची वाढ झाली आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला पुन्हा एकदा दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. सरकारतर्फे एक कनेक्शनवर 12 सिलिंडर अनुदानित मिळणार आहेत. तर तेरावा सि‍लिंडर हा खरेदी करण्‍यासाठी बाजारमुल्य आकारले जाईल, असे सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. आता तेरावा सिलेंडरला वाढीव 16 रुपये 50 पैसे द्यावे लागणार आहेत.

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दरवाढ जाहीर केली आहे.  पेट्रोल दरात 1 रूपये 69 पैशांनी तर डिझेलच्या दरात 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ लगेचच विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

वेबदुनिया वर वाचा