गुडस एंण्ड सर्व्हिसेज टॅक्स अर्थात जीएसटी आठ टक्क्यांवर कायम राखण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच घेण्यात आली.
या विषयी बोलण्यास वॅटच्या सदस्यांनी नकार दिला आहे. मुल्यवर्धीत कर कायम ठेवणार का वाढवणार या विषयावर यात बैठकीत चर्चा करण्यात आली.
समितीचे अध्यक्ष असीम दासगुप्ता यांनी बैठकीनंतर दिलेल्या माहितीनुसार लवकरच या विषयी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेत त्यांच्याशी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे.