गोल्डमन सॉक्स छोट्या उद्योगांना मदत करणार

अमेरिकेतील छोट्या उद्योगांना मदत करण्याचा निर्णय अमेरिकेतील आर्थिक संस्था असलेल्या गोल्डमन सॉक्सने घेतला आहे. कंपनीने यासाठी 50 कोटी डॉलर पुरवण्याची तयारी दर्शवली असून, यासाठी प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफेट यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

देशातील 10 हजार उद्योगांसाठी ही योजना आखण्यात आली असून, यामुळे देशातील उद्योगांना चालना मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

सल्लागार परिषदेत बफेट यांच्यासह कंपनीचे सीईओ लॉयड ब्लँकफीन आणि हावर्ड बिझनेस स्कूलचे मायकल पोर्टर यांचाही समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा