अमेरिकेतील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत असल्याने आणि थंडी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 78 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहेत.
अमेरिकेत सलग दुसऱ्या वर्षात मोठा हिमप्रपात सुरू असल्याने कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने तेलाचे दर पुन्हा एकदा वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मागील दोन आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात 12 टक्क्यांची वाढ दिसून आली असून, अमेरिकी क्रूड 30 सेंटसने वाढत 78.35 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहे. लंडन ब्रेंट क्रूड तेल 40 सेंटने वाढत 78.71 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहे.