उत्पादनात घट झाल्याने कांदे, डाळींची आयात

गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (11:19 IST)
डाळ तसेच कांद्याच्या देशांतर्गत उत्पादनात घट झाल्यानेकांदा आयातीचे संकट ओढवले असून एकूण आयातींपैकी पहिल्या 250 टनांची खेप मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर पोचला आहे. तर 3223 टन डाळ यापूर्वीच आयात केल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने कळविली आहे. कांदे तसेच डाळीच्या आयातमुळे देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढण्यास मदत मिळणार आहे. शिवाय आठवड्याभरात किरकोळ बाजारात कांद्याचे दर कमी होतील, अशी शक्यता सरकारकडून व्यक्त केली जात आहे. 
 
तर मुंबई आणि चेन्नईच्या बंदरावर 3223 टन डाळ यापूर्वीच दाखल झाली आहे. 
 
डाळीच्या आणि कांद्याच्या देशांतर्गत उत्पादनात घट झाल्याने गेल्या दोन महिन्यात मोठ्या दरवाढीला सामोरे जावे लागले होते. बहुतेक डाळींचे भाव 150 रुपये किलोच्या पुढे गेले असून कांद्याने 70 रुपयांचा दर गाठला होता. 

वेबदुनिया वर वाचा