आयटीसीने वाढवले उत्पादनांचे दर

आयटीसीने आपल्या सिगरेट ब्रांड इंडिया किंग्सचे दर 10 रुपयांनी वाढवले आहेत, तर बेन्सन एंण्ड हेजेसच्या दरात 5 रुपयांची वाढ केली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 20 सिगारेट असलेल्या पॅकेटच्या इंडिया किंग्सचे दर 100 रुपयांवरून 110 रुपये करण्यात आले आहेत. तर बेन्सनचे एक पॅकेट 105 रुपयांचे झाले आहे.

भारतात ब्रांडेड सिगारेटचा व्यवसाय 20 हजार कोटी रुपयांवर आहे. यात आयटीसीची सर्वाधिक भागिदारी आहे.

वेबदुनिया वर वाचा