जाणून घ्या कसे कसे अंधविश्वास प्रचलित आहे परदेशात

सोमवार, 18 जून 2018 (12:03 IST)
सामान्यरूपेण असे मानले जाते की भारतात अंधविश्वास आणि धार्मिक मान्यता फार प्रचलित आहे पण असे नाही आहे परदेशात देखील फार वेग वेगळ्या मान्यता आहे, ज्यांना वाचून तुम्ही आश्चर्यात पडाल तर कधी तुम्हाला हसू येईल... तर जाणून घेऊ त्या मान्यतांबद्दल..
 
* थायलँडमध्ये अशी मान्यता आहे की जर तुम्ही स्वयंपाकघरात गाणे म्हणता तर तुम्हाला वयाने जास्त जोडीदार मिळेल. महत्त्वाचे म्हणजे की स्वयंपाक करताना शिट्टी वाजवण्याबद्दल येथे कुठलीही मान्यता नाही आहे.
 
* बांगलादेशामध्ये अशी मान्यता आहे की परीक्षेआधी अंडं (खास करून उकडलेला) खाल्ल्याने परीक्षेत देखील अंडं अर्थात शून्य मिळतो. 
 
* जर चमचा किंवा काटा खाली पडला तर, महिला अतिथी येईल आणि चाकू पडला तर पुरुष अतिथी येईल. ही रशियाची मान्यता आहे.
 
* तायवानमध्ये मृत व्यक्तीकडून नोटा जाळण्यात येतात ज्याने त्याला स्वर्गात कुठलाही त्रास होत नाही. यात ही खर्‍या नोटांच्या जागेवर बाजारातून खरेदी केलेल्या नकली मुद्रा जाळण्यात येतात.
 
* पोलँडमध्ये असे म्हटले जाते की जर तुम्ही हँडबॅगला जमिनीवर ठेवले तर त्याच्या आतला पैसा गायब होऊन जाईल.
 
* अमेरिकेत अशी मान्यता आहे की गर्भवती महिलेने जर आपल्या खिशात बटाटे ठेवले तर तिला आरोग्याशी निगडित कुठलीही समस्या येत नाही.
 
* जर्मनीत असे म्हटले जाते की सकाळी सकाळी वयाने मोठ्या दोन बायांजवळून जाणे टाळावे, नाहीतर तुमचा दिवस खराब जाईल.
 
* कोरियात असे म्हटले जाते की खोलीत ठेवलेला पंखा चालवून सर्व खिडक्या बंद करून झोपायला नाही पाहिजे, नाहीतर पंखा खोलीतील सर्व वार शोषून घेईल आणि तुम्हाला जिवंत राहण्यासाठी वार राहणार नाही.
 
* लॅटिन अमेरिकी देश ग्वाटेमालामध्ये लोक वाईट दृष्टापासून बचाव करण्यासाठी मुलांना लाल रंगाच्या वस्तूंचा वापर करतात, जसे लाला मूंगाचे ब्रेसलेट किंवा लाल टोपी.
 
* तुर्कीत असे मानले जाते की दोन अशा व्यक्तींच्या मध्ये उभा असाल ज्यांचे नाव एकसारखे असतील तर त्या वेळेस तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होते.
 
* अमेरिका, कोलंबिया आणि स्पेनमध्ये अशी मान्यता आहे की जर वधूने अशी वस्तू धारण केली असेल ज्यात काही नवीन, काही जुने आणि काही उधार मागितलेले तर तिला सौभाग्याची प्राप्ती होते.
 
* वेनेजुएलामध्ये अशी मान्यता आहे की जर अविवाहित युवतीच्या पायाला झाडू लागली तर तिचे कधीच लग्न होत नाही. म्हणून तेथील मुली झाडू लावणार्‍या लोकांच्या जवळ कधीच जात नाही.
 
* रशियात असे मानले जाते की कोणत्याही मुलीला भेट म्हणून घड्याळ देऊ नाही. यामुळे संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो.
 
* ब्राझीलमध्ये अशी मान्यता आहे की जर तुम्ही कापामध्ये कॉफी टाकण्याअगोदर साखर टाकली तर तुम्ही अमीर बनून जाल.
 
* 1945 ते 1953च्या मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती असलेले हेरी एस. ट्रुमैन यांनी वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी आपल्या ऑफिसच्या दारावर घोड्याची नाल लावून ठेवली होती.
 
* तुर्कीत अशी मान्यता आहे की जेवताना तुमच्या कपड्यावर जेवण पडलं तर तुमच्या येथे त्या दिवशी नक्कीच पाहुणे येतील.
 
* भले कोणालाही माणसाने शिंकलेले आवडत नाही पण इटलीत मंजरीच्या शिंकेला ऐकणे सौभाग्यदायक मानले जातात.
 
* तुर्कीमध्ये अशी मान्यता आहे की जर वराने विवाह समारंभात एका मित्राचे नाव आपल्या जोड्याच्या खाली लिहिले आणि चालून चालून जर ते नाव मिटले तर त्या मित्राचे लग्न लवकर होत.
 
* जपानमध्ये अशी मान्यता आहे की जर तुम्ही तुमच्या घरात मांजरीची अशी मूर्ती ठेवाल ज्यात तिचा पंजा उठलेला असेल तर तुम्ही सौभाग्यशाली असाल आणि आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळवाल.
 
* ब्राझीलमध्ये अशी मान्यता आहे की खेळताना एखादा मुलगा डोक्यावर उभा झाला तर या गोष्टीचे संकेत आहे की त्याची आई परत आई बनणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती