बॉलिवूडमधून बर्याच दिवसांपासून गायब झालेली अभिनेत्री आएशा टाकिया खूप दिवसांनंतर कॅमेर्यासोर आली आहे. आएशा मुंबईतील गोरेगावच्या एका स्टुडिओमध्ये जाहिरातीची शूटिंग करीत आहे. तिचे त्यावेळीचे काही फोटोज कॅमेर्यात कैद झाले. याबाबतचा खुलासा आएशाने स्वतःच केला असून ती या ठिकाणी जाहिरातीचे शूटिंग करीत आहे. त्याचबरोबर लवकरच चित्रपटात येण्याची इच्छा असल्याचेही तिने बोलून दाखविले आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर आएशा आपले फॅशनेबल फोटो अपलोड करीत असते. ती आपल्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.