जर तुम्हाला सतत धन हानी होत असेल तर करा हे 5 उपाय

शनिवार, 29 एप्रिल 2017 (15:27 IST)
ज्योतिष शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहे ज्यांचा वापर करून तुम्ही सतत होत असलेली धन हानीहून स्वत:चा सुटकारा करू शकता. तर जाणून घ्या असे पाच उपाय –   
 
पहिला उपाय
रात्री झोपताना डोक्याजवळ एका तांब्यात दूध भरून ठेवावे. सकाळी हे दूध बबूलच्या झाडाला चढवून द्या. यामुळे वाईट नजरेमुळे जर धन हानी होत असेल तर त्यातून सुटकारा मिळतो आणि धन लाभ होणे सुरू होतो.  
 
दुसरा उपाय
रोज गणपतीची पूजा करताना दूर्वा जरूर अर्पित कराव्या. तसेच श्री गणेशाय नमः चा जप कमीत कमी 108 वेळा करावा. हा उपाय केल्याने धन हानी थांबते आणि घरात सुख-समृद्धी वाढते.  
 
तिसरा उपाय
गुरुवारी शिवलिंगावर हळदीची गाठ चढवावी. हा उपाय केल्याने भाग्यातील येणार्‍या सर्व अडचणी दूर होतात आणि धन लाभ होतो.  
 
चवथा उपाय
शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करावी आणि तिच्या फोटोसमोर बसून ॐ श्री नमः मंत्राचा जप 108 वेळा करावा. हा उपाय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाची चणचण दूर होण्यास मदत मिळते.  
 
पाचवा उपाय
सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध चढवल्याने कुंडली दोष दूर होण्यास मदत मिळते आणि धन हानी थांबते.  

वेबदुनिया वर वाचा