पेट्रोलियम जेलीचे विविध उपयोग

शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (09:29 IST)
मैत्रिणींनो, हिवाळा सुरू झाला की पेट्रोलियम जेलीच्या जाहिराती सर्वत्र झळकू लागतात. हिवाळ्यात असलेल्या कोरड्या हवामानामुळे त्वचा रुक्ष होऊ लागते.
अशी खरखरीत त्वचा त्रासदायक ठरते. अशा वेळी या त्वचेला पुन्हा मूळस्वरूपात आणण्याचं काम पेट्रोलियम जेलीचा वापर करून केलं जातं. पेट्रोलियम जेलीचा उपयोग केवळ 
 
त्वचेचा स्निग्धपणा कायम राखण्याइतपतच होतो असं नाही. या व्यतिरिक्तही पेट्रोलियम जेलीच्या काही वेगळ्या उपयोगांविषयी...
* अँटी रिंकल क्रीम- पेट्रोलियम जेलीमुळे त्वचेतील स्निग्धांश कायम राखला जातो. त्यामुळे त्वचा कोरडी पडून अकाली येणार्याि सुरकुत्यांच्या प्रमाणात घट होते.
* लिप बाम- पेट्रोलियम जेलीचा उपयोग लिप बामसारखाही केला जातो. पेट्रोलियम जेली ओठांना हायड्रेट करून त्यांचा नरमपणा कायम ठेवते.
* नैसर्गिक चमक- या दिवसात मेकअप केल्यानंतरही चेहरा निस्तेज दिसू लागतो. पेट्रोलियम जेलीच्या वापराने चेहर्या वर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
* मेकअप रिमुव्हर- मेकअप काढून टाकण्यासाठी मेकअप रिमुव्हरऐवजी पेट्रोलियम जेलीचा वापर करता येणं शक्य आहे.
* कलर स्टेन रिमुव्हर- हेअर कलर करताना हेअर लाईनला पेट्रोलियम जेली लावा. त्यामुळे कलर स्काल्पवर पसरणार नाही.
* परफ्यूम बेस- परफ्यूम मारण्यापूर्वी त्या जागेवर पेट्रोलियम जेली लावा. परफ्यूमचा सुगंध जास्त काळ राहतो.
* आफ्टर शेव्ह लोशन- शेव केल्यानंतर त्वचाकोरडी होते. त्यामुळे त्या ठिकाणी पेट्रोलियम जेली लावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती