घरगुती या वस्तूंचा उपयोग केल्यास अकाली पांढरे केस होतील नैसर्गिकरित्या काळे

गुरूवार, 20 जून 2024 (20:00 IST)
जर तुम्ही पांढरे केस नैर्सगिकरित्या काळे करण्यासाठी उपाय शोधत असाल तर तुमच्या स्वयंपाक घरातील या वस्तू नक्कीच चांगला उपाय ठरू शकतो  हा उपाय फक्त सोप्पाच नाही तर खूप साधा, स्वस्त आणि प्रभावी आहे. तर चला जाणून घेऊ या कोणता आहे हा उपाय 
 
आजकाल पांढरे केस होणे ही सामान्य समस्या झाली आहे.लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेकांचे केस अकाली पांढरे होत आहे. पांढरे केस तुमचे व्यक्तिमत्वच नाही तर तर आत्मविश्वास देखील कमी करतात. अनेक लोक केसांना काळे करण्यासाठी हेयर प्रोडक्ट्स आणि नैसर्गिक उपायांची मदत घेतात. पण त्यामुळे विशेष फरक पडत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला विशेष उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे अकाली झालेले पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.
 
पांढरे केस काळे करण्यासाठी आल्याच्या उपयोग- 
Use of Ginger To Blacken White Hair: आयुर्वेदात आले खूप महत्वाचे औषध सांगितले आहे.आले फक्त आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे. आले मध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण तुमच्या केसांना काळे करण्यासाठी मदत करतात. 
 
आले हेयर पॅक-
1 मोठा आले तुकडा 
2 मोठे चमचे नारळाचे तेल 
1 मोठा चमचा मध 
 
आले सोलून घ्या मग त्याचे छोटे छोटे तुकडे करावे. आता आले मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट करावी.या पेस्टला बाऊलमध्ये काढून त्यामध्ये नारळाचे तेल आणि मध मिक्स करावे. आता ही पेस्ट चांगल्या पद्धतीने केसांमध्ये लावावी. मग 30-40 मिनिट केसांमध्ये लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाकावे.
 
आले हेयर पॅकचे फायदे- 
1. आले हेयर पॅक केसांना खोलवर पोषण डेरो आणि केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होते.
2. नारळाचे रेल केसांना मऊ बनवते आणि मध केसांची चमक वाढवते. 
3. या हेयर पॅकचा नियमित उपयोग केल्यास केस काळे होण्यास मदत होते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती