फणसाच्या सेवन नंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

गुरूवार, 6 जून 2024 (07:52 IST)
फणस आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण फणसाची भाजी खाल्यानंतर काही वस्तू खाऊ नये. यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते. जाणून घ्या फणस खाल्यानंतर काय खाऊ नये. 
 
उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. डायबिटीज पासून तर ब्लड प्रेशरच्या लोकांसाठी फणस खूप आरोग्यदायी असते. जेवणात फणसाची भाजी जेवणाचा स्वाद वाढवते. फणसामध्ये फाइबर, विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी, पोटॅशियम, कार्बोहाइड्रेट, जिंक आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हे सारे पोषक तत्व रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच फणस खाल्यानंतर काही वस्तूंचे सेवन करू नये. 
 
1. दूध-जर तुम्ही फणसाची भाजी खात असाल तर दुधापासून बनलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका. फणस आणि दूध एकत्रित सेवन नेल्यास त्वचा विकार होऊ शकतात. 
 
2. मध-मध आणि फणस एकत्रित खाणे आरोग्यासाठी घातक असतात. जर तुम्ही फणसाची भाजी खाल्ल्यानंतर मध युक्त पदार्थ खात असाल तर ब्लड शुगर अनियंत्रित होऊ शकते. 
 
3. भेंडी- काही ओक फणसाची भाजी सोबत भेंडीची भाजी खातात जे आरोग्यासाठी चांगले नाही. हे काँबिनेशन त्वचेवर डाग निर्माण करू शकतात. 
 
4. पपई-जर तुम्ही फणसाची भाजी खाल्यानंतर पपई खात असाल तर असे करू नये. ज्यामुळे शरीरामध्ये सूज निर्माण होऊ शकते. 
 
5. पान-जर तुम्हाला जेवण झाल्यानंतर पण खाण्याची सवय असले. जर तुम्ही फणसाची भाजी खाल्ली असेल तर पान खाऊ नका. यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Published By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती