लसणाच्या सालीचा वापर या समस्यांवर करा.

बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (08:25 IST)
लसणाचा  वापर प्रत्येक घरात केला जातो भाजीमध्ये लसूण वापरतात हे अन्नाची चव वाढविण्याचे काम करतो. हे आरोग्याला आणि त्वचे ला आणि केसांना फायदा देतो.  ह्याची साले देखील निरुपयोगी म्हणून टाकून देतो हे खूप कमी येतात. ह्याचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो. ह्याच्या साली मध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. चला तर मग ह्याच्या सालीचे फायदे जाणून घेऊ या. 
 
* स्नायूंच्या पिळीपासून आराम मिळते-
जर आपल्याला स्नायूंची वेदना आणि पीळ येण्याच्या त्रासामुळे  त्रस्त असाल तर लसूणाचे साल चांगल्या प्रकारे धुऊन 10 ते 20 मिनिटे उकळवून घ्या. स्नायूंच्या पिळी पासून आराम मिळेल. 
 
* त्वचे ची खाज कमी करते- 
त्वचेच्या खाज पासून त्रस्त आहात तर लसूण चे अँटी फंगल गुणधर्म त्वचे वरील खाज होण्याच्या त्रासापासून आराम देते.या साठी त्वचेवर लसणाच्या सालीचे पाणी लावा.
 
* वनस्पतींसाठी नैसर्गिक खत -
या मध्ये असलेले पोषक घटक झाडाची वाढ करण्यास आणि त्यांना निरोगी ठेवण्यात सक्षम आहे. 
 
* त्वचे साठी चांगले-
त्वचेच्या कोणत्याही समस्या साठी लसणाच्या सालीची पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा आपल्या अँटी बेक्टेरियल  गुणधर्माने समृद्ध असल्यामुळे लसूणाची साले पुरळ, मुरूम काढण्यात मदत करते. मुरूम असल्यास लसणाचे साल वाटून लावा.
 
* केसांसाठी चांगले- 
लसणाच्या साली पाण्यात उकळवून केसांमध्ये वापरावे. केसांच्या सर्व समस्या दूर होतात.साली वाटून या मध्ये ऑलिव्ह तेल मिसळून लावल्याने केसांवर चमक येते केसांचा कोंडा कमी करण्यासाठी सालीं मध्ये लिंबू मिसळून मुळात मसाज करा.
 
* पायांची सूज कमी करण्यासाठी -लसणाच्या साली  घालून पाणी उकळवून घ्या आणि त्या पाण्यात  पाय घालून बसा असं केल्याने पायावरची सूज नाहीशी होते. 
 
* सर्दी पडसं कमी करण्यात - 
लसणाच्या साली  पाण्यात उकळवून घ्या आणि हे पाणी प्यावं. असं केल्याने सर्दी पडसं पासून त्वरितच आराम मिळेल.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती