नितळ आणि चकाकती त्वचा मिळविण्यासाठी टिप्स

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (08:38 IST)
बऱ्याच मुलींची त्वचा इतकी स्वच्छ असते की त्यांना बघावंसं वाटते आपल्याला देखील अशी त्वचा मिळवायचे असल्यास या टिप्स अवलंबवा
 
1 पाणी भरपूर प्या- भरपूर पाणी प्या आणि अंतर्गत ताजेतवाने राहा. या मुळे शरीरातली घाण बाहेर निघते आणि नवीन पेशींचे निर्माण होते.
 
2 ताजे ज्यूस प्या-  दररोज दिवसातून किमान दोन ग्लास ताजे ज्यूस प्या- या मुळे त्वचेला पोषण मिळेल आणि त्वचा उजळेल.
 
3 पुरेशी झोप घ्या- जर आपण ऑफिसच्या कामामुळे उशिरा पर्यंत जागता आणि सकाळी आपली झोप पुरेशी होत नाही तर ह्याच्या परिणाम आपल्या त्वचेवर पडू शकतो. दिवसातून किमान 8 तास झोपावं.
 
4 आपल्या आहारात लिंबू घ्या- आपल्या आहारात लिंबाचे सेवन करावं. या मध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे शरीराची घाण दूर करते. लिंबू सलॅड वर पिळून घ्या किंवा गरम पाण्यात पिळून घ्या.
 
5 अक्रोड- या मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आढळतात. जे त्वचे साठी चांगले मानले आहे. या शिवाय आपण अक्रोडाच्या तेलाने त्वचेची मॉलिश करू शकता. या मुळे आपण तरुण दिसाल.  
 
6 संत्री- हे आपल्या त्वचेला चकचकीत करण्यासाठी मदत करते. आपण ह्याचे ज्यूस देखील बनवून पिऊ शकता. किंवा सालींना वाळवून ह्याची पेस्ट बनवू शकता. या मुळे त्वचा उजळेल.
 
7 ग्रीन टी - हा एक हर्बल चहा आहे. सनबर्न ठीक करून त्वचेमधून डाग नाहीसे करते आणि त्वचा मऊ करते. 
 
8 मासे- मासे मध्ये ओमेगा 3 आढळते जे त्वचेसाठी आवश्यक व्हिटॅमिन आहे.
 
9 टोमॅटो - हे नियमित खाल्ल्यानं शरीरावर वृद्धत्व हळू-हळू येत. हे त्वचेला फ्री रॅडिकल्स पासून वाचवते आणि त्वचा चकचकीत करते.
 
10 केळीचे मास्क -केळीला मॅश करून त्यामध्ये हळद आणि लिंबाच्या रसाच्या काही थेंबा मिसळा. ही पेस्ट मानेवर आणि चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे सोडा.नंतर धुऊन घ्या. असं आठवड्यातून एकदा केल्यानं त्वचा चकचकीत होईल.  
 
11 अंडी - अंडी खाल्ल्याने शरीर देखील चांगले आणि बळकट बनते हे त्वचेसाठी चांगले आहे. अंडी आपल्या आहारात समाविष्ट करा आणि नितळ आणि चकचकीत त्वचा मिळवा.  
 
12 स्क्रब करा- आठवड्यातून किमान 2 वेळा स्क्रब करावं असं केल्यानं नवी त्वचा येते आणि जुने डाग फिकट होतात.
 
13 डाळिंब - या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट आढळते. जे त्वचे मधील जखमा भरून काढण्यात मदत करते. ह्याचे ज्यूस प्यायल्यानं रक्त वाढते, त्वचेमध्ये लालिमा येते. 
 
14 डाळी -या मध्ये प्रथिने असतात, या मुळे त्वचेमध्ये नवीन पेशीं बनतात आणि त्वचा नितळ आणि चकचकीत होते. 
 
15 बटर फ्रूट-  त्वचेला मॉइश्च करण्यासाठी बटर फ्रूटचे ज्यूस प्यावे. हे त्वचेला चमकवते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती