लग्नापूर्वी त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करून पहा, सौंदर्य चमकेल

बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (13:10 IST)
प्रत्येक वधूला लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर दिसण्याची इच्छा असते आणि यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात. हळदीचा वापर वधू-वरांसाठी केला जात असला तरी त्यासोबत आणखी काही घटक आहेत जे त्वचा स्वच्छ आणि सुंदर बनवतात. तुम्हालाही नैसर्गिक चमक हवी असेल तर तुम्ही हे उपाय करून पाहू शकता.
 
क्लींजिंगपासून सुरुवात
सर्वप्रथम चेहऱ्याची स्वच्छता करा. यासाठी कच्चे दूध आणि बेसन वापरता येते.

चेहरा एक्सफोलिएट करा
त्वचा स्वच्छ ठेवायची असेल, तर वेळोवेळी स्क्रब करत राहणे फार गरजेचे आहे. स्क्रब करण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे धुवा.

एक चमचा बदाम आणि थोडे दही घ्या. दोन्ही मिक्स करा आणि 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहऱ्यावर हलके पाणी लावून हलक्या हातांनी चोळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात वाळलेल्या लिंबू किंवा संत्र्याच्या सालीची पावडरही टाकू शकता.
 
तांदळाच्या पिठाचा स्क्रब देखील चेहऱ्यासाठी खूप चांगला मानला जातो. हे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि डेड स्किन काढून त्वचा मऊ करण्यास मदत करते. थोडे तांदळाचे पीठ आणि कच्चे दूध चांगले मिसळा. 10 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर हलक्या हाताने चोळून काढून टाका आणि नंतर धुवा.
 
एक चमचा बेसन आणि चिमूटभर हळद कच्च्या दुधात किंवा गुलाबपाणीमध्ये मिसळून चेहऱ्याला लावा. काही वेळ असेच राहू द्या आणि नंतर हलक्या हाताने स्क्रब करा. हे स्क्रब टॅनिंग दूर करण्यासाठी आणि रंग साफ करण्यासाठी प्रभावी आहे.
 
फेस पॅक लावा
चेहरा स्क्रब केल्यानंतर फेसपॅक लावायला विसरू नका. त्यामुळे उघडे छिद्र बंद होतात आणि चेहरा चमकू लागतो.
 
एका अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये एक चमचा मध मिसळा. 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा.
 
तेलकट त्वचा असलेल्यांसाठी मुलतानी मातीचा पॅक चांगला काम करतो. एक चमचा मुलतानी माती गुलाब पाण्यात मिसळून लावा आणि पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा.
 
चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी फ्रूट पॅक देखील लावता येतात. अर्धे सफरचंद किसून, पिकलेल्या पपईचा लगदा आणि मॅश केलेले केळे एकत्र करून चेहऱ्याला लावा. अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा.
 
एक चमचा संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये गुलाबजल मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर धुवा. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी हा पॅक उत्तम आहे.
 
कूलिंगसाठी 
चेहरा स्वच्छ केल्यानंतर किंवा फेसपॅक लावल्यानंतर स्वच्छ मऊ कपड्यात बर्फाचे तुकडे घेऊन चेहऱ्याला चोळा. यामुळे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारेल.
 
आईस क्यूब मसाज करताना चेहऱ्यावर मॉइश्चरायझरचे काही थेंब लावा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि घट्ट होते. बर्फाचे तुकडे पिंपल्सच्या समस्येपासूनही बऱ्याच अंशी सुटका करतात.
 
टोनर
गुलाब पाणी हे नैसर्गिक टोनर आहे. ते लावण्यापूर्वी चेहरा नीट पुसून घ्या आणि नंतर गुलाब पाण्यात भिजवलेले कापसाचे पॅड चेहऱ्यावर चांगले थोपटून घ्या. चेहऱ्यावर घट्टपणा येईल.

जर त्वचा तेलकट असेल तर ग्रीन टी तुमच्यासाठी जास्त फायदेशीर असेल. ग्रीन टी गरम पाण्यात बुडवून पाणी थंड होऊ द्या. स्प्रे बाटलीत भरून दिवसातून दोनदा चेहऱ्यावर लावा.
 
तांदळाचे पाणी टोनरचेही चांगले काम करते. हे उघडे छिद्र बंद करण्यास मदत करते. तांदूळ काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी चेहऱ्याला लावा.
 
ओठांची काळजी
एक छोटा चमचा साखर थोडे मध मिसळून ओठ स्क्रब करा. नंतर ओल्या टॉवेलने पुसून घ्या.
 
ओठांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेलात आवश्यक तेल मिसळा आणि 10-20 मिनिटे ओठांवर ठेवा. नंतर कापडाने पुसून टाका. त्यानंतर लिप बाम लावा.
 
शिया बटरचा वापर घरी लिप बाम बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. एक चमचा शिया बटर वितळवून त्यात थोडी क्रीम, गुलाबपाणी आणि एक छोटा चमचा मध घाला. हे मिश्रण हवाबंद डब्यात ठेवा आणि दिवसातून 2-3 वेळा ओठांवर लावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती