Skin Care Tips : नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

बुधवार, 13 डिसेंबर 2023 (22:49 IST)
Skin Care Tips :हिवाळ्याच्या हंगामात खाण्या-पिण्याची चंगळ असते. हा ऋतू प्रवासासाठी आणि खाण्यासाठी सर्वात योग्य असला तरी त्वचेशी संबंधित अनेक समस्या या ऋतूत दिसू लागतात. वास्तविक, हिवाळ्यात टाळूला खाज सुटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे अशा अनेक समस्यांना समोरी जावे लागते. लोक त्यांच्या त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घेतात.
 
त्वचेची आणि केसांची काळजी घेताना नखांची देखील काळजी घेतली पाहिजे. या हंगामात नखे कोरडी पडतात आणि तुटतात.हिवाळ्यात नखांची अशा प्रकारे काळजी घ्या. या टिप्स अवलंबवा.
 
बेस कोट लावा- 
नखांवर बेस कोट लावल्याने नख धुळी आणि घाणीपासून वाचतात आणि मजबूत होतात.  
 
नखांना मॉइश्चरायझ करा:
हिवाळ्यात नखे खूप कोरडी होतात, अशा परिस्थितीत त्यांची आर्द्रता टिकवून ठेवणे खूप गरजेचे असते. यासाठी नखांना खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाने मॉइश्चरायझ करू शकता. असं केल्याने ते मॉइश्चराइज होतात आणि कोरडे होऊन  तुटत नाही. 
 
नेल मास्क लावा- 
नखांची योग्य काळजी घेण्यासाठी नेल मास्क लावा.या साठी  बेकिंग सोडा किंवा अंडी आणि मध लिंबूमध्ये मिसळून नखांना लावू शकता. नखांसाठी हा एक चांगला नेल मास्क आहे. 
 
नखांना मोकळे ठेवा -
हिवाळ्यात तुम्ही नेहमी नेलपेंट लावल्यास तुमच्या नखांना श्वास घेणे कठीण होईल. अशा स्थितीत वेळोवेळी नखांना नेल पेंट न करता मोकळे सोडा.आणि  श्वास घेऊ द्या. 
 
पाण्यात जास्त भिजवू नका-
, हिवाळ्यात तुमची नखे पाण्यात जास्त भिजवू नका. असे केल्यास नखांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो. यामुळे नखे कमकुवत होऊ शकतात. आणि लगेच तुटतात.

Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती