बेसन, दही आणि मध याचे फेस पॅक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये 2 लहान चमचे चाळून घेतलेलं बेसन घेऊन त्यात 2 मोठे चमचे दही आणि एक मोठा चमचा मध तसेच 1 लहान चमचा गुलाबपाणी मिसळा. हे मिश्रण चेहर्यावर लावण्यापूर्वी चेहरा क्लींजरने स्वच्छ करुन घ्या. चेहर्यावर आणि मानेवर हे मिश्रण लावा आणि 15 मिनिटांसाठी तसेच राहू द्या. नंतर पाच मिनिटे हलक्या हाताने स्क्रब करा आणि मग पाण्याने धुऊन घ्या. चेहरा रगडून पुसू नका फक्त हलक्या हाताने टिपून घ्या. आपल्या लगेच परिणाम दिसून येईल. हा फेस पॅक आपण आठवड्यातून दोनदा लावू शकतो.
चेहरा उजळतो
यात बेसनमुळे चेहर्याची टॅनिंग दूर होण्यास मदत होते आणि फाइन लाइन्स तसचे सुरकुत्या दूर होतात तर दही त्वचेला ब्राइटेन करण्यास मदत करतं याने एजिंग स्पॉट्स कमी होण्यास मदत होते. मधाचे एंटीमायक्रोबियल आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण निस्तेज, असमान त्वचा टोन सुधारण्यात मदत करते.
डाग नाहीसे होतात
या घरगुती उपायामध्ये समाविष्ट असलेल्या पदार्थांमध्ये आढळणारे पोषक डाग, मुरुम आणि सुरकुत्या यांसारख्या त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्यास मदत करतात, तर गुलाब पाण्यातील दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे ते त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते.