पील ऑफ मास्कमुळे त्वचेला या पाच समस्या येऊ शकतात

मंगळवार, 5 मार्च 2024 (21:30 IST)
पील ऑफ मास्क ने त्वचा ओढली जाते. यामध्ये ब्लीच असते. जे त्वचेला प्रभावित करते. याला लावल्यामुळे फोलिकल इन्फेक्शन होऊ शकते. त्वचेची सुंदरता वाढवायला आपण अनेक वस्तु वापरतो. ज्यातील एक आहे पील ऑफ मास्क, हे त्वचेला आतपर्यंत स्वच्छ करून आणि नविन त्वचा बनेल असे सांगतो. अनेक वेळेस याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने केला जातो. ज्यामुळे चेहऱ्याला नुकसान होते. चला जाणून घेऊ या पील ऑफ मास्क वापरल्यामुळे तुमच्या त्वचेचे काय नुकसान होते? 
 
1. त्वचा खेचली जाते- पील ऑफ मास्क ला चेहऱ्यावर लावले जाते व ते काढले जाते. ज्यामुळे चेहऱ्याची  त्वचा खेचली जाते. तसेच डोळे, ओठ यांना देखील नुकसान होते. आणि खूप वेळापर्यंत त्वचा खेचलेली राहते . 
 
2. त्वचा खराब होते- काही पील ऑफ मास्क मध्ये ब्लीच असते जे चेहऱ्याच्या त्वचेला नुकसान देते. ही समस्या खासकरुन ज्यांची त्वचा सवेंदनशील असते त्यांना निर्माण होते. 
 
3. फोलिकल इन्फेक्शन- पील ऑफ मास्क ला ओढून काढल्यामुळे त्वचेत असणाऱ्या छोट्या केसांमध्ये इंफेक्शन होते. हे फोलिकल इन्फेक्शन होऊ शकते. जे त्वचेला आतून नुकसान करते. 
 
4. त्वचेचा कोरडेपणा- काही माक्स मध्ये काही प्रमाणात तेल नसते. ज्यामुळे त्वचा कोरडी पडते ही समस्या जास्त करून त्यांना येते ज्यांची त्वचा आधीपासूनच कोरडी असते. 
 
5. त्वचेचा ओलाव्याला समस्या- काही मास्कमुळे चेहऱ्यावर ओलावा राहत नाही. ज्यामुळे  कोरडी होते आणि त्वचा जळजळणे सारखी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे त्वचेचा नैसर्गिक उजाळपणा देखील प्रभावित होऊ शकतो. 
 
या समस्यांना लक्षात ठेऊन सावधानता बाळगूण  पील ऑफ मास्क चा  उपयोग केला पाहिजे. काळजीपूर्वक वापरणे आणि काही दिवस अंतर् ठेऊन वापरल्यास यामुळे होणारे नुकसान पासून आपण नक्कीच दूर राहु शकतो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती