घरातच 10 मिनिटातच करा इन्स्टंट पेडिक्योर, पाय स्वच्छ होतील

शनिवार, 9 जानेवारी 2021 (13:01 IST)
बऱ्याच लोकांना ही समस्या असते की त्यांचा चेहरा आणि कपडे तर चकचकीत असतात पण जेव्हा गोष्ट पायांची येते तेव्हा ते काळपट आणि डागांचे दिसतात. आपण नेहमी आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देतो पण पायाकडे लक्ष देणं विसरतो त्यासाठी पेडिक्योरची गरज असते. परंतु महागडे पेडिक्योर करणे परवडत नाही. तसेच तासनतास पाण्यात पाय बुडवून ठेवणे आवडत देखील नाही. हे वेळघेणे सुद्धा आहे. या साठी आपण घरातच इन्स्टंट पेडिक्योर करून आपल्या पायांना सुंदर बनवू शकतो.

या पेडिक्योर मध्ये पाय जास्तकाळ पाण्यात बुडवून देखील ठेवण्याची गरज नाही आणि हे त्यांच्या साठी उत्कृष्ट ठरणार आहे ज्यांच्या कडे वेळेचा अभाव आहे आणि जे स्वतःवर जास्त लक्ष देऊ शकत नाही. ह्याचा वापर केल्याने पायाचे टॅनिग नाहीशी होते, यामुळे पायाचे डाग नाहीसे होतात आणि पाय उजळतात. हे आपण घरातील वस्तूंनीच करू शकता. या साठी महागडे उत्पादक देखील लागत नाही. 
 
या साठी लागणारे साहित्य 
खोबरेल तेल, नेलकटर, टूथपेस्ट, टूथब्रश, फायलर, उटणे साबण, तुरटीचे पाणी किंवा हळद, मसुरीच्या डाळीची पूड, मुलतानी माती, टोमॅटो प्युरी, हळद, दही.
 
* वापर कसे करायचे आहे -
सर्वप्रथम पाय धुऊन नखे नेलकटरच्या साहाय्याने कापून घ्या आणि शक्य असल्यास असे ठेवा की त्यांना इच्छेनुसार शेप देऊ शकाल. हे खूप सोपे आहे आणि या साठी पाय भिजवून ठेवण्याची गरज नाही. हे खूप कमी वेळेत होणारे घरघुती पेडिक्योर आहे. नेलकटरच्या साहाय्याने नखाच्या बाजूस जमलेली घाण शक्य तितकी काढून टाका.
 
इच्छित असल्यास नेलकटरच्या साहाय्याने नखांचा आकार निश्चित करू शकता किंवा फायलरच्या साहाय्याने हे व्यवस्थित करू शकता. 
 
या नंतर नारळाचं तेल पायाला लावून मॉलिश करा. ह्याच्या मदतीने पायाला पुरेसे पोषण द्याल. नारळाचं तेल अधिक प्रमाणात घ्या आणि चांगल्या प्रकारे मॉलिश करा. 
 
या नंतर टूथपेस्ट (जेल बेस्ड नसावे) आणि जुन्या ब्रशच्या साहाय्याने आपल्या पायाच्या नखांना स्वच्छ करा. या मुळे आपले नखे पूर्णपणे स्वच्छ होतील आणि जी घाण असेल ती निघून जाईल. शक्य असल्यास मिंट वाली टूथपेस्ट घ्या. हे नखांसाठी चांगले आहे. या मुळे नखाचा पिवळसरपणा देखील निघून जाईल.
 
नंतर आपण स्किन व्हाईटनिंग साबण किंवा DIA उटणे साबणाचा वापर करू शकतो आणि ते उपलब्ध नसेल तर आपण कोणत्याही उटणे किंवा तुरटीचे पाणी आणि बॉडी वॉशने पाय स्वच्छ करा. हे पायाला चांगल्या प्रकारे लावून लोफा ने पाय स्वच्छ करा आणि पाण्याने स्वच्छ करून घ्या.  
 
* स्क्रब आणि पाया साठी पॅक - 
सर्वप्रथम दोन चमचे मसुराच्या डाळीची पूड, 3 चमचे मुलतानी माती, 4 चमचे ताज्या टोमॅटोची प्युरी, 1/4 चमचे हळद, 2-3 चमचे दही घालून मिसळा. हे स्क्रब आणि पायाच्या पॅकचेही काम करतात. जर पायाला काही डाग आहे किंवा ते काळपट झालेले आहेत किंवा मऊ नाही तर हे पॅक आपल्या पायाला अधिक चांगले बनवेल. या पॅक ला वाळू द्या किंवा 5 मिनिटातच काढून टाका. नंतर पायाला धुऊन घ्या आता आपले पेडिक्योर तयार आहे. या नंतर पायाला मॉइश्चरायझर लावा. पायांचे पेडिक्योर पूर्ण झाले. हे उपाय स्वतः अवलंबवा आणि पायाला स्वच्छ करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती