उन्हाळ्यात अशा प्रकारे घ्या 'लुक'ची काळजी

बुधवार, 29 मार्च 2023 (13:40 IST)
उन्हाळ्यात ऊन, धूळ व घामामुळे त्वचा तेलकट होते. अशा वातावरणात त्वचेची काळजी घेण्यासोबतच मेकअप बदलणेसुद्धा गरजेचे आहे. थंडीपेक्षा या मोसमात मेकअप कमी करायला पाहिजे.
 
चेहर्‍याला 'नॅचरल लुक' देण्याचा प्रयत्न करावा. त्वचा डागरहित असेल तर फाउंडेशनचा प्रयोग करू नये. चेहर्‍यावर थोडे लिक्विड मॉइश्चराइझर आणि बेबी पावडर लावल्याने चेहर्‍याला 'ट्रान्सल्युसेंट' लुक मिळेल.
 
रात्रीच्या वेळी पार्टीला जात असाल तर चेहर्‍यावर लिक्विड फाउंडेशन हा सर्वांत चांगला पर्याय आहे. तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीमयुक्त मॉइश्चराइझरचा वापर करायला पाहिजे. फाउंडेशन किंवा ब्लशर हलक्या हाताने लावा. चेहर्‍याचे डाग लपवायचे असतीलल तर फाउंडेशन किंवा पावडर लावायच्या आधी कंसीलर लावायला पाहिजे. कंसीलर एका छोट्याशा ब्रशने लावून वर थोडी पावडर लावावी. नॅचरल लुकसाठी लिपस्टिकच्या जागी लिंप-ग्लास लावावे. रात्री चेहरा आकर्षक ठेवण्यासाठी लिपस्टिक लिंप ब्रशच्या मदतीने लावावी. उन्हाळ्यात दिवसा लाइट ब्राउन, रोज, पिंक आणि रात्री ब्रांज, कोरल, कॉपर आणि बरगंडी रंगांच्या लिपस्टिकचा वापर करायला हवा. त्यामुळे चेहर्‍याच्या सौंदर्यात वाढ होईल.
 
डोळ्यांसाठी दिवसा फक्त काजळ लावावे. गरज भासल्यास आय शॅडोसुद्धा लावू शकता. ब्राउन आणि ग्रे आय शॅडो तुमच्या चेहर्‍याला नॅचरल लुक देतात. रात्रीच्या वेळी आय लायनर लावू शकता. त्यामुळे डोळे सुंदर दिसतील. रात्रीच्या मेकअपमध्ये आयब्रोजच्या खाली थोडंसं हाय-लाइटर लावावे. यासाठी तुम्ही पांढरा किंवा कोणत्याही लाइट रंगाची शेड वापरू शकता. मस्कारा जरूर लावावा.
  
गालांवर हलक्या ब्लशरचा वापर करावा. पावडर ब्लशरचा वापर करणे सर्वांत सरळ असते. जे नेहमी मेकअप करण्याअगोदर लावायला पाहिजे. ब्लशरला चीक बोन्सवर लावून त्याला बाहेरच्या बाजूने व्यवस्थित करून घ्यावे. चेहर्‍याच्या रंगाशी मेळ खात असलेल्या ब्लशरचा प्रयोग करावा. परफ्यूमसुद्धा मेकअपचा एक भाग आहे. दिवसा कोलोन लावायला पाहिजे. कपड्यात लीफ-ग्रीन, ऑलीव-ग्रीन, लाईम-ग्रीन, लेमन येलो, क्रीम, लाइट ब्राउन, पिंक, टरक्वॉइस ब्ल्यू आणि लाइट ब्ल्यू रंग चांगले वाटतात. फ्लोरल प्रिंट्स, चेक्स, डॉट्स किंवा लेस आणि एम्ब्रॉयडरीचे कपडे पण या ‍दिवसांत छान दिसतात. पण रंगाची निवड करताना थोडी सावधानी बाळगणे जरूरी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती