बीटरूट लिप बाम घरी बनवा, ओठ गुलाबी आणि सुंदर दिसतील

रविवार, 20 मार्च 2022 (11:43 IST)
आजकाल बहुतेक महिला ऑफिसला किंवा बाहेर जाताना लिपस्टिक किंवा लिप प्रॉडक्ट वापरतात. बाजारात मिळणारी लिपस्टिक, लिप बाम, लिप प्रॉडक्ट्स इत्यादी दिसायला खूप छान दिसत असले तरी याच्या सतत वापरामुळे हळूहळू ओठ खराब होतात. अनेकदा ओठ काळे होऊ लागतात किंवा वारंवार कोरडे पडू लागतात आणि क्रॅक देखील जाणवतात. अशा परिस्थितीत आपण स्वत: लिप बाम तयार करु शकता. बीटरूट लिप बाम घरी सहज बनवता येतं.
 
बीटरूटपासून लिप बाम बनवण्यासाठी फक्त तीन गोष्टींची आवश्यकता असेल.
नारळाचं तेल, व्हॅसलीन आणि बीटरूट. या तिन्ही गोष्टी ओठांसाठी फायदेशीर ठरतात. डेड स्किन, त्वचेचा रंग काळा पडल्यावर, त्वचा फाटल्यावर याचा वापर करणारे बरेच लोक आहेत. हा लिप बाम सर्व समस्या त्वरित दूर करतो. तुम्ही ते घरी बनवू शकता. जाणून घ्या हा लिप बाम कसा बनवता येईल.
 
सर्वप्रथम एका भांड्यात 3 चमचे बीटरूटचा रस घ्या.
 
1 चमचा व्हॅसलीन रसात वितळून टाका.यात तेल मिसळा.
आता त्याच भांड्यात व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल तेल टाका.
 
आता तिन्ही गोष्टी नीट मिक्स करा.
 
मिक्स होताच सर्व मिश्रण भांड्यात किंवा छोट्या डबीत टाका.
आता साधारण एक ते दोन तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
तुमचा लिप बाम तयार होईल.
 
हा लिप बाम तुम्ही 10 दिवस ठेवू शकता. इतकेच नाही तर यामुळे ओठ गुलाबी होतील आणि कोरडेही पडणार नाहीत. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही या लिप बामचा वापर केला जाऊ शकतो
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती