नारळाच्या तेलाचे 7 फायदे जाणून घ्या

शनिवार, 29 मे 2021 (08:30 IST)
नारळ तेलाचे बरेच फायदे आहेत. हे प्रत्येक हंगामात अत्यंत उपयुक्त आहे. त्वचेसाठी फायदेशीर.आहे तसेच गंभीर जखम झाल्यावर हे मुलांसाठी देखील वापरले जाऊ शकते. ,
 
नारळ तेल कोणत्याही प्रकारची जळजळ, खाज होण्यावर वापरले जाते. सौंदर्य देखील त्याच्या वापरण्याने उजळते. आपण नारळाच्या तेलाचा वापर करून सुंदर कसे दिसू शकता हे जाणून घ्या -
 
1 नाभीवर लावावे-लोकांचे ओठ कोरडे झाल्यावर लवकर फाटतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर नारळाचं तेल लावून झोपा.असं 15 दिवस करा.यामुळे आपले ओठ मऊ होतील आणि त्यावरील त्वचा देखील निघणार नाही.
 
2 पुरळ,खाज येणे,कोरडी त्वचा - त्वचेला या तिन्ही समस्या असतील तर नारळ तेल लावा.या तिन्ही समस्यां पासून मुक्ती मिळून त्वचा मऊ होईल.
 
3 चमकदार त्वचा - रात्री झोपण्यापूर्वी नारळाचं तेल कोमट करून मानेवर आणि त्वचेवर हळुवारपणे मॉलिश करा.असं केल्याने आपली त्वचा खूप मऊ आणि चमकदार बनेल.
 
4 सुरकुत्यापासून संरक्षण- नारळाच्या तेलात ओमेगा 3 असण्यासह अँटीएजिंग घटक आढळतात. हे नियमितपणे चेहऱ्यावर लावल्याने त्वचा घट्ट होऊन सुरकुत्या कमी होतील.
 
5  मेकअप रिमूव्हर - आपल्याकडे मेकअप रिमूव्हर नसल्यास आपण नारळ तेल देखील वापरू शकता. कापसाच्या बॉलवर तेल घेऊन 2 मिनिटांत सहजपणे मेकअप स्वच्छ करा.
 
6 नखे उजळतील - होय, नखे उजळण्यासाठी देखील नारळ तेल वापरू शकता. नेल पॉलिश साफ केल्यानंतर, आपले नखे पूर्णपणे कोरडे दिसतात नखांवर नारळ तेल लावा.नखे चमकतील. 
 
7 स्ट्रेच मार्क्स काढते- गरोदर पणात खाज आल्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात. त्यांना कमी करण्यासाठी डॉक्टर देखील नारळाचं तेल लावण्याचा सल्ला देतात.तसेच शरीरावर कुठे ही जखम झाली असल्यास दररोज नारळाचं तेल लावू शकता.डाग कमी होतात.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती