फक्त मधुमेहच नाही तर केस आणि त्वचेसाठीही जांभूळ खूप फायदेशीर आहे, जाणून घ्या

रविवार, 1 मे 2022 (15:35 IST)
जांभूळ हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की जांभूळ केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. जांभूळमध्ये अँटी-बॅक्टेरियल, आस्ट्रिजन्टआणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. जांभूळ वाळवून त्याची पावडर बनवू शकता किंवा तुम्ही बाजारातून तयार जांभळाची पावडर विकत घेऊ शकता.जांभूळ त्वचा आणि केसांसाठी किती फायदेशीर आहे जाणून घ्या.
 
1 मुरुमांसाठी -
अनेकांच्या चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असते. विशेषतः उन्हाळ्यात हा त्रास वाढतो. मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जांभळाचा वापर करू शकता. जांभळा मध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे चेहऱ्यावर बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास आणि मुरुम कमी करण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा जांभूळ पावडर घेऊन त्यात दूध घालून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी मुरुमांवर लावा. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. याशिवाय1 चमचा जांभूळ बी  पावडर, 1 चमचा संत्र्याची पावडर आणि 1 चमचा मसूर डाळ पावडर घ्या. आता त्यात गुलाबपाणी आणि बदाम तेलाचे काही थेंब मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15  मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. असे केल्याने तुमची मुरुमांची समस्या लवकर नाहीशी होईल. 
 
2 डागांसाठी -
चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी तुम्ही जांभळाचाही वापर करू शकता. या मध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात जे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करतात. यासाठी 2 चमचे बेसनामध्ये 1 चमचा जांभूळ पावडर, गुलाबजल आणि बदामाचे तेल काही थेंब मिसळून  पेस्ट तयार करा . आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. या फेस पॅकचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतील आणि तुम्हाला बेदाग  त्वचा मिळेल.
 
3 तेलकट त्वचेसाठी -
तेलकट त्वचेच्या लोकांसाठीही जांभळाचा वापर खूप फायदेशीर आहे. जांभळामध्ये आस्ट्रिजन्ट गुणधर्म आहेत जे त्वचेवर सीबम प्रॉडक्शन नियंत्रित करण्यास मदत करतात. यासाठी 2 चमचे जांभळाचा गर, 1 चमचा तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. या पेस्टचा नियमित वापर केल्याने तेलकट त्वचेत फरक दिसेल. 
 
4 मजबूत आणि चमकदार केसांसाठी- 
जांभूळ फक्त त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीबेक्टेरिअल आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, ज्यामुळे केस निरोगी आणि चमकदार बनण्यास मदत होते. या मध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे कोलेजन तयार करण्यास मदत करते. यामुळे केसांची चांगली वाढ होते आणि केस मजबूत होतात. जांभळाचा हेअर पॅक बनवण्यासाठी मेंदीमध्ये जांभळाची पावडर आणि दही मिसळून पेस्ट बनवा. आता हा हेअर पॅक टाळूवर आणि केसांना लावा. हा हेअर पॅक केसांना लावा आणि 2-3 तास ​​तसाच राहू द्या. यानंतर केस शॅम्पूने धुवा. या हेअर पॅकचा वापर करून कोरड्या आणि निर्जीव केसांपासून सुटका मिळेल. जांभळाचा हेअर पॅक लावल्याने केसांमधील कोंड्याची समस्याही संपते आणि केस मजबूत आणि चमकदार होतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती