स्किन केयर रुटीनमध्ये सहभागी करा भोपळ्याचा फेसपॅक, चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल

शनिवार, 15 जून 2024 (16:16 IST)
त्वचेसाठी भोपळा हा खूप फायदेशीर असतो. तुम्ही नेहमीच्या स्किन केयर रुटीनमध्ये देखील भोपळ्याचा फेसपॅक सहभागी करू शकतात. 
 
भोपळा फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर असतो. उन्हाळ्यात अनेक लोक त्वचेसंबंधित समस्यांचा सामना करतात. भोपळ्यामध्ये असणारे तत्व तुमच्या त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. 
 
भोपळ्याचा फेसपॅक- 
भोपळ्यापासून बनलेला नैसर्गिक फेसपॅक तुमच्या त्वचेसाठी वरदान आहे. भोपळ्याचा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा दही, एक चमचा मध, अर्धा चमचा हळद, दोन कप किसलेला भोपळा हे सर्व मिश्रण एकत्रित करावे. आता या फेसपॅकला चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. तसेच 20 मिनिट राहू द्यावे. त्यानंतर चार धुवून घ्या. 
 
भोपळ्याचा स्क्रब-
भोपळ्याचा स्क्रब तयार करण्यासाठी भोपळ्याच्या पेस्टमध्ये एक मोठा चमचा लिंबाचा रस, एक मोठा चमचा दही, मध मिक्स करावे. व या स्क्रबनं 5 मिनिट मसाज करा. नंतर 10 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सीडेंट चांगल्या प्रमाणात असते. जे तुमचे त्वचेचे आरोग्य सुरक्षित ठेवते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती