उन्हाळ्यात गुलाबाच्या पाकळ्यांनी चमकेल त्वचा, आरोग्यसाठी आहे फायदेशीर

गुरूवार, 30 मे 2024 (06:36 IST)
गुलाबाचे फुलच नाही तर गुलाबाच्या पाकळ्या देखील आरोग्यासाठी फायदेशीर असतात. नियमित गुलाबाच्या पाकळयांचा उपयोग केल्यास त्वचा आणि आरोग्य दोघांना फायदा होतो. चला जाणून घेऊ या गुलाबाच्या पाकळ्यांचे फायदे 
 
Rose Petals Benefits: उन्हाळ्यामध्ये आरोग्यासोबत त्वचेची देखील काळजी घेणे गरजेचे असते. नाही तर तुम्हाला समस्या येऊ शकतात.  या हवामान मध्ये जर तुम्हाला फिट राहायचे असेल तर तसेच त्वचा देखील उजळ राहावी असे वाटत असले तर या करीत तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग करू शकतात. गुलाबाच्या फुलांनी घर सजवले जाते. ज्यामुळे घरामध्ये सुगंध दरवळत राहतो. तर गुलाबाच्या पाकळ्या  त्वचेसोबत आरोग्यसाठी देखील फायदेशीर असतात. 
 
त्वचा उजळण्यासाठी खा गुलाबाच्या पाकळ्या 
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अनेक औषधीय गुण असतात, ज्यामुळे त्वचेसंबंधित अनेक आजारांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या रिकाम्या पोटी खाल्यास सुंदरता वाढते. सोबतच कोरडी त्वचा, डाग आणि आतील सूज यांपासून अराम मिळतो. गुलाबाच्या पाकळ्यांना अँटीऑक्सीडेंट प्रॉपर्टीजचा चांगला सोर्स मनाला जातो, ज्यामुळे त्वचेतील पेशींना नुकसान न होता सौंदर्यात वाढ होते. 
 
गुलाबाच्या पाकळ्या खाण्याचे फायदे 
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये कॅल्शियम, विटामिन ए, विटामिन ई, विटामिन सी आणि आयरन चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. अश्यावेळेस जर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन केले तर, आजार, इंफेक्शन आणि एलर्जी होण्याचा धोका कमी होतो. तसेच पॉट स्वच्छ राहते, व बद्धकोष्ठता, गॅस या समस्या होत नाही. तसेच गुलाबाच्या पाकळ्या खाल्याने मन शांत राहते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती