या 5 कारणांमुळे काळे पडतात अंडरआर्म्स

अंडरआर्म्स काळे पडणे सामान्य गोष्ट आहे. पण तरी हे काळे होत असावे यासाठी या पाच कारणांवर विचार केला पाहिजे:
 
हेअर रिमूव्हल क्रीम: हेअर रिमूव्हल क्रिममुळे अंडरआर्म्स काळे पडू शकतात. केस काढण्यासाठी आपण ही अशी क्रीम वापरत असाल तर ती लगेचच वापरणे बंद करावी.
 
रेझर: केस काढण्यासाठी रेझर वापरणे सोपे असले तरी योग्य नाही. याने कडक केस येतात तसेच यामुळे त्वचा काळी पडते.
 
डिओ: काही केमिकल युक्त डिओ किंवा परफ्यूम वापरल्याने अंडरआर्म्सची त्वचा काळी पडू लागते. असे उत्पाद वापरणे टाळावे.
 
मृत त्वचा: मृत त्वचा काळसरच असते, जी काळानंतर अजून काळी आणि कडक होऊ लागते. यापासून वाचण्यासाठी नियमित स्वच्छता आवश्यक आहे.
 
घाम: घामामुळे त्वचा काळी पडू लागते. आपल्याला अधिक घाम येत असल्यास अंडरआर्म्स काळे पडू लागतात.
 
तर या पाच कारणांमुळे जर आपली त्वचा काळी पडत असेल तर हे प्रकार टाळावे आणि त्वचेची योग्य काळजी घ्यावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती