लिंबू
लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग, अँटीबॅक्टिरियल आणि अँटीसेप्टिक एजंट आहे. अनेक त्वचासंबंधित आजारासाठी लिंबाचा रस वापरण्यात येतो. लिंबू कापून अंडरआर्म्सवर चोळा किंवा लिंबाचा रस प्रभावित भागेवर लावून 15 मिनिट राहून द्या. आपण लिंबाच्या रसात जरा साखरही मिसळू शकता. असे आठवड्यातून 2-3 वेळा करा. लिंबाने त्वचा कोरडी पडते म्हणून नंतर लगेच मॉइस्चराइजर लावा.
संत्र्याची साल
संत्र्याची साल त्वचेचे रंग हलके करण्यात फायदेशीर ठरते. साल काही दिवस उन्हाळ्यात वाळवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करा. आता दोन ते तीन चमचे पावडर गुलाब पाण्यात किंवा दुधात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर 10 ते 15 मिनिट लावून ठेवा नंतर धुऊन टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.