Holi 2022:होळीतील रंगांपासून मुक्त होण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

गुरूवार, 10 मार्च 2022 (21:23 IST)
होळीच्या निमित्ताने अनेकांना रंग खेळायला आवडतात. पण रंग खेळल्यानंतर स्क्रब किंवा पार्लर उत्पादनाचा वापर करून रंग काढल्यावर त्यामुळे ते त्वचेचे नुकसान करू शकतात. त्वचेचा रंग दूर करण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत. त्यांचा वापर केल्याने रंग निघून जातो आणि त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे यावेळी रंग खेळल्यानंतर हे घरगुती उपाय करून पहा. यांचा खूप उपयोग होईल.
 
1 केळी- घरी रासायनिक रंगांपासून मुक्त होण्याचे अनेक मार्ग आहेत. यापैकी एक म्हणजे केळी. एक केळी मॅश करून त्यात लिंबाचा रस घाला. नंतर त्वचेवर लावा आणि तसेच राहू द्या.  ते सुकायला लागल्यावर थोडे गुलाबपाण्याने चोळा. याने त्वचेचा रंग सहज निघेल आणि त्वचेतील ओलावा टिकून राहील. 
 
2 बेसन हे नैसर्गिक स्क्रब आहे. रंग उतरवण्यासाठी बेसनामध्ये फक्त लिंबाचा रस आणि मलई  चांगले मिसळा. नंतर ते संपूर्ण चेहऱ्यावर आणि रंग लागलेल्या भागावर  लावून सोडा. सुकल्यावर हलक्या हातांनी चोळा. यामुळे रंगही निघून जाईल आणि त्वचेला कोणतीही हानी होणार नाही. 
 
3 गव्हाच्या पिठाचा कोंडा नैसर्गिक स्क्रब म्हणून वापरता येतो.  हा कोंडा दुधात मिसळा आणि पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट त्वचेवर लावा आणि सोडा. काही वेळाने हलक्या हातांनी मसाज केल्यानंतर पाण्याने धुवा. त्वचेवर लावलेला रंग सहज काढला जाईल.
 
4 मसूर आणि हरभरा डाळ बारीक करून पावडर बनवा. नंतर या पावडरमध्ये दूध किंवा गुलाबपाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचेवर लावा आणि सोडा. नंतर हलक्या हातांनी घासून स्वच्छ करा. या पेस्टमुळे त्वचेवर जमा झालेला रंगही निघून जाईल आणि चेहऱ्यावर तेजही येईल. 
 
चला तर मग यंदाची होळी जल्लोषाने  खेळा आणि या घरगुती उपायांच्या मदतीने रंगापासून मुक्त व्हा. त्वचेला कोणतीही हानी होणार नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पराभवानंतरही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुष्कर सिंह धामी यांचे नाव चर्चेत आहे. भाजप अनिल बलुनी यांनाही मुख्यमंत्री बनवू शकते. हे मूळचे उत्तराखंडचे आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती