होळी हा मिठाई आणि रंगांनी भरलेला आनंदाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी एकमेकांचे वैर विसरून एकमेकांवर प्रेमाने रंग आणि गुलाल उधळतात. पण ज्यांना होळीच्या रंगांची अॅलर्जी आहे त्यांच्यासाठी हा सण त्रासदायक ठरतो. वास्तविक, होळीच्या रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने असल्यामुळे हे त्रासदायी ठरते. आपल्याला ही होळीच्या रंगांची अॅलर्जी असेल तर आतापासून या टिप्स लक्षात घ्या.
* नखांना रंगांपासून वाचवण्यासाठी नेल पेंट देखील वापरू शकता.
* रंगांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी मोहरीचे तेल देखील घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावून होळी आनंदाने खेळा. रंगांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासोबतच त्वचेवर रंगही बसणार नाही.