Hair Care Tips : केसांना शॅम्पु करण्यापूर्वी एकदा हे नक्की वाचा

मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (11:13 IST)
केसांची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे आणि शॅम्पु करणे केसांच्या स्वच्छतेची सर्वात सोपी आणि सामान्य पद्धत आहे. परंतु आपण जर का चुकीच्या पद्धतीने शॅम्पु करीत असाल तर केसांवर त्याचे नुकसान दिसून येतात. पुरेसे फायदे घेण्यासाठी हे योग्यरीत्या करणे आवश्यक आहे. जाणून घ्या शॅम्पु करण्याच्या या 5 टिप्स -
 
1 सहसा केस धुतल्याने केसांमधील असणारे नैसर्गिक तेल आणि गुळगुळीतपणा नाहीसे होतात, ज्यामुळे ते राठ होऊ शकतात. या साठी आवश्यक आहे की केस धुण्याच्या किमान 1 तासापूर्वी डोक्याची मालीश करावी. असे केल्याने केसांना पोषण मिळेल.
 
2 केस धुण्यापूर्वी केस विंचरावे ज्याने केस तुटण्यापासून वाचतात. केस धुण्यापूर्वी गुंता काढल्याने केस धुणं सोपं जातं आणि केसांची तुटातूट होत नये. 
 
3 केस धुण्यापूर्वी प्रथम त्यांना कोमट पाण्याने धुवावे आणि चांगल्या प्रकारे ओले करावे. आता काही सेकंदांनंतर शॅम्पूचा वापर करावा जेणे करून केसांमध्ये शॅम्पु सर्वदूर पोहोचेल.

ALSO READ नारळाचे तेल फक्त केसांसाठी नव्हे, एकदा हे देखील करून बघा...
 
4 शॅम्पु क्रीम रूपात लावण्या पेक्षा थोड्या पाण्यात घोळून लावणे नेहमीच योग्य ठरेल. याने कमी प्रमाणात शॅम्पु लागतो आणि केसांच्या मुळापर्यंत पोहचून केसांना स्वच्छ करण्यास मदत होते. 

ALSO READ Skin Care Tips : ब्लीच करण्यापूर्वी जाऊन घ्या या 9 खास गोष्टी ....
 
5 शॅम्पु लावल्यावर बोटांच्या अग्रभागेने मॉलिश करावी आणि पाणी टाकून स्वच्छ करावं त्याच बरोबर खालील केसांना देखील स्वच्छ करावं. आपले केस अधिक दाट किंवा गुंताळ असल्यास शॅम्पुनंतर कंडिशनर वापरावं, अन्यथा कंडिशनरची गरज नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती