सध्याच्या काळात औषधी आणि सौंदर्य उत्पादन म्हणून कोरफडाची मागणी वाढत आहे, पण हे औषध आणि त्याचे फायदे बरेच जुने आहेत. कोरफड ज्याला घृतकुमारी किंवा ग्वारपाठा म्हणून ओळखले जाते, हे आरोग्य आणि सौंदर्यविषयक समस्येचा एक खात्रीशीर उपाय आहे.
आयुर्वेदात याला घृतकुमारी म्हणून महाराजांचे स्थान दिले आहेत आणि औषधीच्या जगात याला संजीवनी असेही म्हणतात. याच्या 200 प्रकारच्या जाती असतात, पण या मधून पहिले 5 मानव शरीरास उपयुक्त आहे. त्यातील बारना डेंसीस जात ही पहिल्या क्रमांकावर आहेत.
1 यात 18 धातू, 15 अमिनो एसिड आणि 12 व्हिटॅमिन(जीवन सत्वे) असतात हे उष्ण असून पौष्टिक देखील आहे. त्वचेवर लावणं फायदेशीर असत. यातील काटेरी पाने सोलून कापून रस काढतात. सकाळी अनशापोटी 3-4 चमचे याचा रस घेतल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा आणि चपळता राहते.
2 कोरफड हे दिसायला एक विचित्र वनस्पती जरी वाटत असल्यास तरी याचे गुणधर्म बरेच आहे. हे मूळव्याध, मधुमेह, गर्भाशयाचे आजार, पोट बिघाड, सांधे दुखी, त्वचेतील खराबी, मुरूम, कोरडी त्वचा, उन्हानं जळालेली त्वचा, सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग, डोळ्यांच्या खाली झालेले काळे वर्तुळे, भेगा पडलेल्या टाचांसाठी फायदेशीर तर आहेच तसेच हे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतं आणि शरीरातील रोग पार्टीकारक क्षमतेला वाढवतं.
3 कापल्यावर, भाजल्यावर, अंतर्गत जखमांवर कोरफड आपल्या अँटी बॅक्टेरिया आणि अँटी फंगल गुणधर्मामुळे जखमा लवकर भरून काढतं. रक्तामधील साखरेची पातळीला नियंत्रित ठेवते. याचा गीर किंवा जेल काढून केसांचा मुळात लावावं केस काळेभोर, दाट, लांब आणि बळकट होतात.
4 हे डासांपासून देखील त्वचेचे रक्षण करतं. सौंदर्येत तजेलापण येण्यासाठी हर्बल कॉस्मेटिक उत्पादने म्हणून बाजारपेठेत कोरफड जेल, बॉडी लोशन, हेअर जेल, स्किन जेल, शॅंपू, साबण, फेशियल फोम आणि ब्युटी क्रीमामध्ये हेयर स्पासाठी ब्युटी पार्लर मध्ये सर्रास वापरण्यात येत आहे. कमीतकमी जागेत, लहान लहान कुंड्यांमध्ये कोरफड सहजरीत्या लावता येत.