आपण आपल्या चष्म्याला कितीपण सांभाळून ठेवा, पण तरीही त्यावर स्क्रॅच येतातच. या स्क्रॅचमुळे आपण नवीन चष्मा विकत घेण्याचा विचार करीत असल्यास, तर थोडं थांबा. आम्ही आपणास अश्या काही टिप्स सांगत आहोत ज्यांचा प्रयत्नाने आपण चष्म्यावरून स्क्रॅच काढू शकता.
चला तर मग जाणून घेऊ या चष्म्यावरील स्क्रॅच काढून त्याला नवीन कसं बनवावं -
1 घरात ठेवलेले टूथपेस्ट घ्या, एका कपड्यावर थोडंसं टूथपेस्ट लावून चष्म्यावर स्क्रॅच आणि डाग असलेल्या जागेवर हळुवारपणे चोळा. काही वेळेनंतर आपल्याला डाग पुसट झालेले दिसणार.