आले फक्त चहाचा स्वाद वाढवत नाही तर सुंदर दिसण्यात देखील मदत करतं

सुंदर दिसण्यासाठी महिला महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा पॉर्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रीटमेंटवर हजारो रुपये खर्च करतात परंतू आज आम्ही आपल्या हैराण करणारे सत्य सांगणार आहोत की आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणार्‍या आल्यामुळे देखील आपली सुंदरता वाढू शकते. आल्यात आढळणारे अँटीऑक्सीडेंट त्याला खास बनवतात. यामुळे आजार तर दूर होतातच सुंदरता देखील वाढते.
 
आल्याचं सेवन केल्याने रक्त परिसंचरण योग्य रित्या होत असल्याने त्वचेत उजळपणा येतो. सुरकुत्या नाहीश्या होतात. आलं एक अँटी बँक्टेरियल औषधी आहे. अॅटी ऑक्सीडेंट्सने भरपूर असल्यामुळे याचे प्राकृतिक गुण त्वचेचं तारुण्य राखण्यास मदत करतं.
 
आल्यामुळे त्वचेवरील डाग, पुरळ नाहीसे होतात. अनेक प्रकाराच्या फेस मास्कमध्ये देखील आलं वापरलं जातं. 
 
आल्याचं तेल वापरल्याने डोक्यातील कोंडा दूर होतो. आलं वापरल्याने केस गतीने वाढू लागतात. टक्कल पडत असल्यास आल्याच्या रसात लिंबाचं रस मिसळून केसांना लावावं. असे केल्याने देखील केस गळतीवर फायदा दिसून येईल.
 
जळजळ होत असलेल्या त्वचेवर आल्याचं रस लावल्याने आराम मिळतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती