मजबूत केसांसाठी 6 पदार्थ, आजपासूनच आहारात सामील करा

शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (11:17 IST)
दूध
दुधामुळे हाडं तर मजबूत होतातच पण यात बायोटिन व्हिटॅमिन असल्याने दूध केसांसाठी फायदेशीर आहे. याने केस मजबूत आणि दाट होतात. दुधात कॅल्शियम, आयरन, कार्बोहायड्रेट, जिंक व अनेक प्रकाराचे व्हिटॅमिन्स आढळतात ज्याने केसांना मजबूती मिळते.
 
बदाम
केसांसाठी प्रोटीनची गरज असते आणि बदाम याचं मुख्य स्त्रोत आहे. बदाममध्ये जिंन, आयरन, फास्फोरस आणि व्हिटॅमिन्स आढळतात. या प्रकारे बदाम एक चांगलं अँटीऑक्सीडेंटप्रमाणे कार्य करतं जे केसांच्या दृष्टीने आवश्यक आहे.
 
ऑलिव्ह ऑयल
यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमणात आढळतं. हे एक चांगलं अँटीऑक्सीडेंट आहे. या गुणांमुळे केसांना सुरक्षा मिळते आणि ऑलिव्ह ऑयलमध्ये ओमेगा 9 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए आणि ई असतं.
 
मध
केस ड्राय असल्यास मधाचा वापर करावा. याने केस चमकदार होतात. मधात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं. यात आयरन, कॅल्शियम आणि पॉटेशियम असल्याने केसांना मजबूती मिळते.
 
कढीपत्ता
कढीपत्त्यात आयरन, कॅल्शियम आणि फास्फोरस साखरे घटक असल्याने केसांसाठी अत्यंत पोषक ठरतं. हे केस पांढरे होण्यापासून देखील वाचवतो. यात जवळपास सर्व प्रकारे व्हिटॅमिन्स आढळतात ज्याने केसांची चमक वाढते आणि केस मजबूत होतात.
 
अंडी
दररोज अंडी खाल्ल्याने ताकद तर मिळतेच तसेच हे केसांसाठी देखील फायद्याचं ठरतं. याने केसांची चमक वाढते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती