डोळ्यांच्या सुंदरतेत पापण्यांचं खूप महत्त्व असतं. काही लोकांच्या पापण्या विरळ असतात ज्यामुळे त्यांना आय मेकअपवर खूप लक्ष द्यावं लागतं किंवा खोट्या पापण्या लावाव्या लागतात. परंतू जराशी केअर केल्याने नैसर्गिकपणे पापण्या दाट होऊ शकतात. यासाठी काही घरगुती उपचार करायचे आहे.
कसे तयार करायचे हे मास्क
1. दोन चमचे एरंडेलचे तेल घेऊन पाच मिनिट मंद आचेवर गरम करा. नंतर आच बंद करून तेल गार होऊ द्या. यात आढळणारे अँटीऑक्सीडेंट रोम विकसित करण्यात मदत करतील आणि पापण्या दाट करतील.
2. व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. सुईने त्यात भोक करून जेल बाहेर काढा. एका चमच्यात घेऊन कस्टर ऑयलसोबत मिसळून घ्या.
3.कोरफडाचे पान घेऊन त्याचे जेल काढा आणि चमच्यात घेतलेल्या मिश्रणात फेटून घ्या.
4. या मिश्रणात एक चमचा पेट्रोलियम जेली मिसळू शकतात. याने पापण्या गळत नाही आणि दाट होतात.
ब्रशच्या मदतीने हे मास्क पापण्यांवर लावा. हे लावण्यापूर्वी आपल्याला पापण्या ब्रशने स्वच्छ कराव्या लागतील.
हे मिश्रण आयब्रो वरही लावू शकता. हे मास्क रात्रभर असेच राहू द्या. सकाळी आपल्याला आपल्या आयब्रो आणि पापण्या नरम वाटतील. हवं असल्यास 30 सेकंद मास्क ने मसाज करू शकता.
हे मास्क फ्रीजमध्ये ठेवू शकता. अप्लाय करण्याच्या काही वेळापूर्वी बाहेर काढावे. एक महिन्यापर्यंत वापरण्याने फरक कळून येईल.
विशेष टीप: हे मास्क वापरताना इतर केमिकल वापरणे टाळावे. यासह प्रोटीन आणि व्हिटॅमिन आढळणार्या आहाराचे सेवन करावे.