आपल्या केसांसाठी कोणते तेल योग्य जाणून घेणे आवश्यक

मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (15:45 IST)
हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की केसांसाठी तेल खूप फायदेशीर आहे. जेव्हा देखील केसांच्या निगा राखण्याची गोष्ट येते त्यामध्ये तेलाचा समावेश नक्की केला जातो. केसांना तेल लावण्याच्या योग्य पद्धती बद्दल आपण बरेच काही ऐकले असतील, परंतु आपल्या केसांसाठी कोणते तेल योग्य आहे हे माहित आहे का ?  नारळाच्या तेलापासून ते ऑर्गन तेल पर्यंतचा वापर केसांसाठी केला जातो. पण आपल्याला त्या तेला पासून जास्तीत जास्त फायदा तेव्हा मिळतो जेव्हा आपण केसांच्या गरजांना समजूनच तेलाची निवड करता. चला तर मग आज आम्ही आपल्याला या लेखात वेगवेगळे तेल आणि त्यांच्या फायद्यांबद्दल माहिती देत आहोत, जे जाणून घेतल्यावर आपण आपल्यासाठी योग्य तेलाची निवड करू शकाल.
 
* नारळाचं तेल- 
केसांचे तज्ज्ञ म्हणतात की जर आपले केस कमकुवत, निस्तेज आहे आणि त्यांना आधार देण्याची गरज आहे तर नारळाचं तेल फायदेशीर ठरेल. हे एक अत्यंत अष्टपैलू तेल आहे आणि हे तुटलेल्या केसांना बरे करण्यास मदत करतं. उष्णतेपासून संरक्षण करत आणि निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देत. आपल्या केसांना आपण नारळाचं तेल लावा आणि एका तासासाठी तसेच राहू द्या. नंतर केसांना शॅम्पूने धुऊन घ्या.
 
* ऑर्गन तेल-
केस तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ऑर्गनचे तेल केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. या तेलामध्ये उच्च प्रमाणात अँटी ऑक्सीडेंट, आवश्यक फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई असत आणि केसांना पोषण आणि हायड्रेट करण्यात मदत करतो. केसांची लवचिकता वाढविण्यात मदत करतो आणि निस्तेज लॉक्सची चमक वाढवतो. ऑर्गन तेल एक उत्कृष्ट अँटीऑक्सीडेंट आहे, म्हणून हे टाळू वरील सूज कमी करण्यास मदत करतो, डोक्यातील कोंडा, डोक्यातील खाज तसेच सोरायसिसवर देखील उपचार करण्यात मदत करतो.
 
* जोजोबा तेल -  
जर आपली टाळू कोरडी असल्यास आणि डोक्यात कोंड्याची समस्या आहे, तर जोजोबाचे तेल ही समस्या दूर करण्यात आपली मदत करतं. कारण हे सीबम नावाचे तेल बनवतं. या तेलाला केसांमध्ये वापरू शकता आणि उपचार म्हणून वापरले जाऊ शकत. हे तेल केस आणि टाळूला हायड्रेट करू शकत आणि डोक्यातील कोंड्याला दूर करण्यात मदत करत.
 
* एरंडेल तेल -
जर आपले केस दाट आहे,तर एरंडेल तेल आदर्श आहे. हे कुरळे केस तसेच तुटणाऱ्या केसांसाठी उपयोगी आहे. हे निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहित करतात आणि या मध्ये फायदेशीर व्हिटॅमिन ई,खनिजे आणि प्रथिने असतात. हे केसांसाठी रात्रभर उपचार म्हणून वापरले जाऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती