हिवाळ्यात डोक्यातील कोंडा होणं ही समस्या सर्वात सामान्य आहे. हे केवळ आपल्या केसांनाच नुकसान देत नाही तर आपल्याला लाजिरवाणी देखील करते. हे दूर करण्यासाठी केमिकल असलेले शॅम्पू, कंडिशनर वापरण्या ऐवजी इतर काही उपाय केल्यानं केसांच्या नुकसानाला टाळता येऊ शकत. चला जाणून घेऊ या काही टिप्स.
2 मीठ -
शॅम्पू करण्यापूर्वी कोंड्याला स्वच्छ करण्यासाठी मीठ अतिशय प्रभावी आहे. मीठाला स्कॅल्पवर किंवा टाळू वर टाकून हळुवार हाताने चोळून घ्या या मुळे मृत त्वचा बाहेर पडेल. काही वेळ चोळल्यावर केस शॅम्पू करून घ्या. आपण अनुभवाल की या उपायामुळे कोंडा कमी होत आहे. जेव्हा देखील आपण शॅम्पू कराल, तेव्हा ही प्रक्रिया अवलंबवा, काहीच काळात कोंड्यापासून सुटका होईल.
4 नारळाचं तेल आणि लिंबाचा रस -
नारळाच्या तेलात एक चमचा लिंबाचा रस मिसळून कोमट करा. आपल्या केसांना या तेलाची मॉलिश करा. नंतर शॅम्पूने आपले केस धुऊन घ्या. ही प्रक्रिया आपण आठवड्यातून किमान 2 वेळा करावी.