वेलचीच्या तेलात अँटीबैक्टीरियल गुण असतात. तसेच हे तेल चेहऱ्यावरील मरूम देखील कमी करते व त्वचेचे सूजने कमी करायला मदत करते.
Cardamom Oil Benefits : वेलचीला इंग्रजीमध्ये Cardamom म्हणतात. ही एक प्राचीन औषधी आहे जी आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. तसेच यासोबत वेलचीचे तेल त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. चला जाणून घेऊ या वेलचीचे तेल कसे वापरावे व कसे ते त्वचेला उजळ बनवते.
पुटकुळी आणि मुरुम यांचा उपचार-
वेलचीच्या तेलात अँटीबैक्टीरियल गुण असतात. जे त्वचेवरील पुटकुळी आणि मुरुम यांना कमी करायला मदत करतात. तसेच त्वचेचे सूजने देखील कमी करते आणि त्वचेला आरोग्यदायी बनवते. या तेलाला रोज त्वचेवर लावल्यामुळे पुटकुळी आणि मुरुम यांची समस्या दूर होते.
त्वचेचा कोरडेपणा दूर करते-
वेलचीच्या तेलात विटामिन C चे प्रमाण चांगले असते. जे त्वचेला मऊ आणि उजळ बनवते. हे तेल दररोज लावल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. तसेच त्वचा सूंदर आणि आरोग्यदायी दिसते.
त्वचेची जळजळ आणि सूजने कमी करते-
वेलचीच्या तेलात अँटी -इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचेचे जळजळ आणि सूज कमी करते. या तेलाच्या नियमित उपयोगामुळे त्वचा लवकर बरी होते.
त्वचेचा रुक्षपणा दूर करते-
वेलचीच्या तेलात असलेले विटामिन E आणि इतर आवश्यक पोषक तत्व त्वचेला ओलावा देतात. त्वचेच्या रुक्षपणा दूर होण्याकरिता हे तेल नियमित लावणे फायदेशीर ठरते.
वाढत्या वयाचे लक्षणे कमी करते-
वेलचीच्या तेलात अँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण असते. हे त्वचेला तरूण ठेवायला मदत करते. म्हणून हे तेल रोज लावल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाही व वाढत्या वयाचे लक्षण दिसत नाही.
या प्रकारे वेलचीच्या तेलाचा उपयोग करून त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेऊ शकतो. तसेच हे तेल एक आरोग्यदायी आणि सुंदर त्वचा प्रदान करते. या तेलाचा रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोग केल्याने उजळ आणि चमकदार त्वचा प्राप्त होते. अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.