एक कप कॉफी प्यायली की कसं अगदी ताजंतवानं वाटतं. जगभरात कॉफीच्या चाहत्यांची कमी नाही. कॉफीचा तो सुगंध दरवळला की कॉफीवेड्याला राहावत नाही. कॉफीचे अनेक ब्रँड्स लोकप्रिय आहेत. तर अशी ही कॉफी फक्त पिण्यासाठीच योग्य आहे असं नाही तर त्या व्यतिरिक्तही कॉफीचे बरेच फायदे आहेत. कॉफी त्वचेसाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. कॉफीच्या सेवनाने लाभ होतातच पण कॉफीचा वापर सौंदर्यवर्धनासाठीही करता येतो.
* केसांच्या मुळाशी असलेल्या मृत कोशिकांमुळेही त्रास होऊ शकतो. टाळूवरील त्वचेच्या स्वच्छतेविषयी खूप काही बोललं जात असलं तरी त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नाही. याच कारणास्तव केस कोरडे होतात आणि कोंड्याच्या प्रमाणातही वाढ होते. टाळूवरील मृत कोशिकांचं प्रमाण कमी करण्यासाठी कॉफीचे कण या त्वचेवर घासावेत. त्याने डोक्याच्या त्वचेवरील मृत कोशिका निघून जातात. अर्थात टाळूवरील त्वचा खूप नाजूक असल्यामुळे ही कृती हलक्या हातांनी करायला हवी.