चेहऱ्याला सुंदर बनवेल हा आयुर्वेदिक चहा मिळतील फायदे, जाणून घ्या कसा बनवावा

बुधवार, 19 जून 2024 (06:36 IST)
जिरे, बडीशोप आणि ओवा यांचा उपयोग लोक खास करून जेवण बनवण्यासाठी करतात. सर्व घरांमध्ये बडीशोप, ओवा, जिरे हे वापरले जातात. तसेच चांगले आरोग्य मिळण्यासाठी तुम्ही जिरे, ओवा, बडीशोप यांचे पाणी पिऊ शकतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. तसेच या तिघे वस्तूंचा तुम्ही चहा देखील बनवून पिऊ शकतात. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. 
 
जिरे, ओवा, बडीशोप चहाचे फायदे-
त्वचेसाठी अँटीसेप्टिकचे काम करते- त्वचेसाठी अँटीसेप्टिकचे काम करते तसेच मिनरल आणि विटामिनचे भांडार आहे. तसेच अँटीसेप्टिक गुणांनी भरपूर आहे. जे त्वचा संबंधित अनेक समस्या दूर करतात.यामुळे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे संक्रमण होत नाही.
 
ऑयली त्वचा- उन्हाळ्यामध्ये ऑयली त्वचेची समस्या असणाऱ्या लोकांनी हा चहा सेवन करावा. कारण उष्णतेमुळे आणू घामामुळे त्वचेवर जास्त प्रमाणात तेल जमा होते. हा चहा सेवन केल्यास या अनेक समस्यांपासून अराम मिळतो.
  
मुरूम समस्या- उन्हाळ्यामध्ये मुरूमची समस्या होते, पण हा चहा त्वचेला थंडावा प्रदान करतो. तसेच चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या आणि डाग कमी करण्यासाठी मदत करतो. 
 
आरोग्यदायी त्वचा- यामध्ये कॅल्शियम, जिंक आणि सेलेनियम भरपूर असते, याकरिता हे हार्मोन ला बॅलेन्स करतात. तसेच शरीरामध्ये  ऑक्सीजनची लेव्हल बनवून ठेवण्यास मदत करतात. 
 
कसा बनवावा? 
या चहाला बनवण्यासाठी कमीतकमी अर्धा चमचे जिरे, धणे, ओवा आणि बडीशोप एका ग्लासमध्ये रात्रभर भिजवत ठेवा आणि सकाळी उकळवून घेऊन गाळून घ्यावे. यामध्ये थोडेसे मध, अर्धा लिंबू आणि मीठ मिक्स करा. तुमचा चहा बनून तयार आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती