ब्युटी टिप्स उजळती त्वचा मिळण्यासाठी घरी बनवा बदाम क्रीम

शुक्रवार, 12 मार्च 2021 (18:52 IST)
त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या आणि तपकिरी डाग पासून सुटका मिळवण्यासाठी घरी बनविलेले बदाम क्रीम वापरावे. हे क्रीम वापरून चेहरा स्वच्छ आणि  उजळतो चेहऱ्यावर एक नवीन चकाकी येते. या शिवाय बदाम क्रीम चेहऱ्याला पोषण देखील देते या मुळे चेहरा निरोगी राहतो. हे चेहऱ्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो .तसेच त्वचेची जळजळ आणि सूज कमी करतो . या मध्ये फॅटी ऍसिड असत . जे त्वचेवरील तेलाला नियंत्रित करतो. या मुळे मुरूम आणि काळे डाग होत नाही. हे नैसर्गिक असल्यामुळे ह्याचे काहीच दुष्परिणाम होणार नाही. ही क्रीम कशी बनवायची जाणून घ्या. 
 
साहित्य- बदाम ,गुलाब जल, कोरफड जेल, बदामाचे तेल.
कृती -
घरात बदाम क्रीम बनविण्यासाठी बदाम पाण्यात भिजवा. नंतर सोलून गुलाबपाणी घालून वाटून घ्या. गाळून त्यातील पाणी काढून घ्या.या मध्ये कोरफड जेल आणि बदामाचे तेल मिसळा. सर्व साहित्य व्यवस्थितरित्या मिसळा आणि बाटलीत भरून रात्री झोपण्यापूर्वी तसेच सकाळी देखील लावून घ्या.ह्याचा नियमित वापर केल्याने चमकती आणि नितळ त्वचा मिळेल. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग, ब्लॅक हॅड्स नाहीसे होतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती