प्रत्येक स्त्रीचे स्वप्न आहे की तिची त्वचा चकचकीत, नितळ आणि निरोगी असावी. त्या त्वचेची काळजी घेण्यासाठी बरेच काही करतात. तरी ही त्वचा चांगली मिळत नाही. त्या त्वचेची काळजी घेताना नकळत काही चुका करतात या मुळे त्यांच्या त्वचे ला फायद्याचा ठिकाणी नुकसान होतात. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या चुका करू नये.
* नियमितपणे क्लिंजिंग न करणे-
त्वचा चकचकीत बनविण्यासाठी आतून स्वच्छ करायची गरज असते. या साठी त्वचेला क्लिंजिंग करणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच बायका या कडे लक्ष देत नाही. असं करू नका नियमितपणे क्लिंजिंग करा. मेकअप करण्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी क्लिंजिंग करा. असं केल्याने त्वचा उजळेल.