Beauty Mistakes : कॉफीमध्ये या 4 गोष्टी मिसळू नका

गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (17:24 IST)
प्रत्येकाला पिंपल्स फ्री चेहरा हवा असतो. यासाठी अथक परिश्रम घेण्यात येते. त्यासाठी मुली वेगवेगळे प्रयोग करून पाहतात. पण पूर्ण माहिती नसल्यामुळे त्वचा सोलते, चेहरा लाल होतो, मग कोणाला मोठे मुरुम येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून आपण ही चूक पुन्हा करू नये -
 
कॉफी केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही चांगली आहे. बाजारात अनेक कॉफी उत्पादने उपलब्ध आहेत. कॉफीच्या वापराने चमकणारी त्वचा मिळते, मृत त्वचा निघून जाते, पूर्णपणे डागरहित होते. पण या 4 गोष्टी कॉफीमध्ये कधीही मिसळू नका.
 
1. मीठ - कॉफीमध्ये कधीही मीठ मिसळून लावू नका. यामुळे त्वचा जास्त एक्सफोलिएट होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर जळजळ, फोड येणे, खाज सुटणे किंवा त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो. त्यामुळे या दोघांची सांगड टाळा.
 
2. बेकिंग सोडा - जर तुम्ही कॉफीमध्ये बेकिंग सोडा मिसळत असाल तर ते करू नका. यामुळे तुमच्या त्वचेचे अधिक नुकसान होईल. कारण हे दोन्ही एकत्र मिसळल्याने चेहऱ्यावर उलट प्रतिक्रिया येऊ शकते.
 
3. लिंबू - कॉफी तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते. एक्सफोलिएट केल्यानंतर तुमची त्वचा खूप संवेदनशील होते. त्यामुळे कॉफीसोबत लिंबू किंवा वरील गोष्टींचा वापर करू नका. मीठ, लिंबू किंवा सोडा घातल्यास चिडचिड होऊ शकते.
 
4. टूथपेस्ट - कॉफीमध्ये टूथपेस्ट, बेकिंग सोडा, मीठ आणि लिंबू मिसळू नका. असे केल्याने चेहऱ्यावर केमिकल रिअॅक्शन होऊ शकते. चेहऱ्यावर मुरुम आणि फोड येऊ शकतात. यामुळे तुमचा चेहरा सुंदर ऐवजी कुरूप दिसेल.

Edited by : Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती