तू आहेस कोण एखाद्या गाण्याची पुन्हा मांडणी व कल्पना करणारी-एआर रहमान यांनी रोखठोक मत मांडले

मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (15:05 IST)
ओ सजना' या नव्या गाण्याने रिमिक्स गाण्यांबाबतचा वाद पुन्हा एकदा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतो आहे. फाल्गुनी पाठकच्या 'मैने पायल है छनकाई' या सदाबहार गाण्याचे रिमिक्स व्हर्जन बनवल्याने नेहा सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. फाल्गुनी पाठकहीनेहा कक्करवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या वादात काही गायकांनी फाल्गुनीला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी नेहाच्या समर्थनार्थ मतं मांडली आहेत. तशातच आता संगीत क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे एआर रहमान यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे.
 
एआर रहमान यांनी रिमिक्स संगीत संस्कृतीबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी नेहा कक्करचे नाव घेतले नाही, पण एका वृत्तपत्राशी  बोलतानाचे शब्द अप्रत्यक्षपणे तिला टोमणे मारणारेच होते. एआर रहमान म्हणाले, "हल्ली रिमिक्स गाणी जितकी जास्त दिसत आहेत, तितकीच ती गाणी विकृत होत जात आहेत. आता हळूहळू संगीतकाराचा हेतूही विकृतीकडे झुकत चालला आहे. काही संगीतकार गाणं रिमिक्स करताना म्हणातात की मी त्या गाण्याची पुन्हा मांडणी आणि कल्पना केली आहे. तू आहेस कोण एखाद्या गाण्याची पुन्हा मांडणी व कल्पना करणारी? मी नेहमी दुसऱ्याच्या कामाची काळजी घेत असतो. प्रत्येकाने इतरांच्या कलेचा आदर राखायला हवा. रिमिक्स म्हणजे ग्रे एरिया आहे असं मला वाटतं आणि यातून संगीतविश्वाने लवकरात लवकर बाहेर निघायला हवे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती