वयाच्या 30 मध्येच डोळ्यांजवळ येत आहे का सुरकुत्या? होममेड क्रीम वापरून पहा

शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (05:30 IST)
आधुनिक युगात वाढत्या प्रदूषणामुळे तसेच चुकीची जेवण पद्धती यांमुळे त्वचा वय होण्यापूर्वीच वयस्कर दिसु लागते. अशामध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या येतात व या सुरकुत्यांना कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे महागडे क्रीम घेऊन प्रयोग करतात. यामुळे त्वचेला समस्या येऊ शकते. म्हणून प्रयत्न करा की कमी वयात नैसर्गिक प्रोडक्ट वापरणे. या नैसर्गिक प्रोडक्टमुळे सुरकुत्या कमी होतील. आम्ही तुम्हाला स्पेशल डे रेसिपी क्रीम सांगू ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. सुरकुत्या कमी करण्यासाठी घरीच क्रीम कशी तयार करावी जाणून घेऊ या. 
 
साहित्य 
बीवैक्स - 50 ग्राम
एवोकाडो तेल - 2 चमचे 
नारळाचे तेल - 3 चमचे 
लोबान एसेंशियल ऑइल  - 15 थेंब 
चंदन के एसेंशियल ऑइल  - 10 थेंब 
 
कृती 
याला तयार करण्याआधी 1 डबल ऑइल घेणे. यात बीवैक्स, एवोकाडो ऑइल आणि नारळाचे तेल मिक्स करून हे वितळवा. मग हे सर्व वितळले की थंड होण्यासाठी ठेऊन दया. आता यात सर्व एसेंशियल ऑइल मिक्स करणे. मग याला एक एयर टाइट कंटेनर मध्ये सेट व्हायला ठेवणे. 
 
उपयोग कसा करावा-
या क्रिमला सकाळी अंघोळ झाल्या नंतर चेहऱ्यावर लावणे. तत्पूर्वी चेहरा क्लीन करून घेणे. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी देखील ही क्रीम लावू शकतात. 

डे क्रीम लावण्याचे फायदे- 
या क्रिमला लावल्याने तुमची स्किन फ्री रेडिकल्स पासून सुरक्षित राहते. तसेच चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांच्या समस्येला दूर करता येईल. नियमित 2 वेळेस क्रिमला चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला संक्रमण पासून सुरक्षित ठेवले जाऊ शकते.  त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही ही क्रीम लावू शकतात. पण लक्षात ठेवाल की त्वचा जर खराब होत असेल तर तुम्ही एकवेळेस स्किन  एक्सपर्टचा सल्ला घेणे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती