अनेक महिलांना लांब आणि दाट केस आवडतात. लांब आणि दाट केस तुमच्या सौंदर्यात भर घालतात. आजच्या या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या प्रदूषण मुळे केस गळती समस्या वाढली आहे. तसेच अनेक लोकांच्या केसांची ग्रोथ देखील थांबून गेली आहे. या कारणामुळे त्यांचे केस हे लवकर वाढत नाही. केसांना मोठे आणि घनदाट करण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. नियमित रुपाने हे उपाय केल्यावर तुमच्या केसांची ग्रोथ होईल. सोबतच केस तुटने कमी होईल. चला जाणून घेऊ या महिन्याभरात केस लांब कसे होतील.
1. तेलाने मॉलिश करावी- केसांना लांब करण्यासाठी नियमित तेलाची मॉलिश करावी. रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण केसांना तेल लावणे विसरतो आणि तेल न लावता केस धूतो. केसांना निरोगी ठेवण्यासाठी शैम्पू करण्या अगोदर 1ते2 तास पहिले केसांमध्ये तेलाची मॉलिश करणे. तुम्ही नारळाचे तेल, बादाम तेल, रोजमेरी तेल, यांसारख्या तेलाचा वापर करू शकतात.