ऑइलिंग केल्याने केसांना भरपूर पोषण मिळते. ज्यामुळे केसांची ग्रोथ चांगली होते. सोबतच टाळूला रक्त पुरवठा चांगल्या प्रमाणात होतो. आठवड्यातून दोन वेळेस नित्यनेमाने केसांना तेल लावल्यास केसांच्या समस्या कमी होतात. घरीच बनवलेल्या हर्बल ऑइलच्या मदतीने तुम्ही केसांची ग्रोथ आणि आरोग्य चांगले ठेऊ शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एका तेलाच्या रेसिपि बद्द्ल सांगणार आहोत जे गुणकारी आहेत आणि घरीच बनवले जाऊ शकते.
साहित्य-
नारळ, मोहरी किंवा ऑलिव ऑइल – 1/2 कप (कॅरियर तेल)
टी ट्री एसेंशियल ऑइल - 2-3 थेंब
रोजमेरी एसेंशियल ऑइल - 7 थेंब
पेपरमिंट एसेंशियल ऑइल - 2-3 थेंब
लैवेंडर एसेंशियल ऑइल - 1-2 थेंब
तेल केसांना लावण्याची योग्य पद्धत-
केसांना चांगल्या प्रकारे खांद्यांवर करा. यानंतर हे तेल टाळूवर लावून हल्कासा मसाज करावा. आता 2-3 तासांकरिता तेल केसांमध्ये लावून ठेवावे मग माइल्ड शॅपूच्या मदतीने केस धुवून घ्यावे. हे तेल आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस लावावे. यामुळे तुम्हाला खूप लाभ होईल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.