नवीन वर्षांच्या सुरुवातीला गुरू आणि शनी हे दोन्ही महत्त्वाचे आणि मोठे ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये ज्या इच्छा-आकांक्षा तुमच्या मनामध्ये होत्या त्या पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण लाभेल. नवीन आणि भरपूर काम करण्याची तुमची इच्छा असेल. या सगळ्याला अनुसरून आवश्यक असणारे प्रयत्न फळाला येतील.
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : 2016 हे वर्ष तुमचं आर्थिक जीवन सुंदर ठेवेल. पैशामुळे तुम्हाला आनंद लुटण्याची कारणं तर मिळतीलच, पण मित्र देखील खूप उपयोगाचे ठरतील. अर्थात, यामुळे वाहवत जायचं आणि मैत्री आणि नात्यांच्या परिणामी स्वतःचं नुकसान करुन घेण्याचं कारण नाही. नोकरी करणारे कुंभ व्यक्तींना हे वर्ष नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि प्रगती मिळवून देईल. तुमचे वरिष्ठ किंवा जोडीदार असोत, प्रत्येकाला तुमच्यातील कुशल कर्मचारी दिसेल, आणि तुमच्यावर ते प्रशंसेचा पाऊस पाडतील. तुम्ही व्यवसायिक असाल तर दुःखी होण्याचं कारण नाही, कारण 2016 तुमच्यासाठी देखील लाभदायक ठरणार आहे. नोकरदार व्यक्तींना नवीन वर्षांत त्यांचे कौशल्य पणास लावून येणाऱ्या संधीचा चांगला फायदा उठविता येईल. जेवढे जास्त काम तेवढी जास्त कमाई असे समीकरण असेल.
व्यापारी वर्गाला आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखविण्याची इच्छा असेल. नवीन वर्षांच्या सुरुवातीला मोठे धाडस आणि गुंतवणूक करून प्रतिष्ठा वाढविणारा एखादा प्रोजेक्ट हाती घ्यावासा वाटेल. जानेवारी ते मार्च या दरम्यान प्रत्यक्ष कामाला वेग येईल. एप्रिल ते जुल या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतील. बाजारपेठेतील चढ-उतार आणि गिऱ्हाईकांची गरज याचा विचार करून कदाचित तुम्ही आधी ठरविलेली कामाची पद्धत बदलाल. या दरम्यान ‘अति तेथे माती’ एवढेच लक्षात ठेवा. जुलनंतर सप्टेंबपर्यंत काही महत्त्वाचे बदल संभवतात. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या मनात नवीन विचारांना कोंब फुटेल. सप्टेंबरनंतर लाभदायक कालावधी आहे.