* प्रथमेला पेठा खाणे वर्जित असते. खाल्ल्यास धननाश होतो. * द्वितीयेला लहान वांगी व फणस खाणे निषेधार्ह आहे. * तृतीयेला कुरमुरे खाऊ नये. कारण ते खाल्ल्यास शत्रू वाढतात. * चतुर्थीला मुळा खाणे वर्जित आहे. त्याने धननाश होतो. * पंचमीला बेल फळ खाल्ल्याने कलंक लागचतो. * षष्ठीला कडुलिंबाची पाने व त्याने दात घासणे वर्जित आहे. त्यामुळे मोक्षाची प्राप्ती होत नाही. * सप्तमीच्या दिवशी ताडीचे फळ खाणे वर्ज्य आहे. कारण हे खाण्याने मतीभ्रष्ट होते. * अष्टमीच्या दिवशी नारळ खाणे वर्जित आहे. ते खाल्ल्यास बुद्धीचा नाश होतो. * नवमीच्या दिवशी दुधी भोपळा खायला नको. कारण हे खाणे म्हणजे मांसाहार केल्याप्रमाणे आहे. * दशमीच्या दिवशी कलंबी खाणे निषेधार्ह आहे. * एकादशीच्या दिवशी गवारीच्या शेंगा खाणे वर्जित आहे. * द्वादशीच्या दिवशी (पोई) पुतिका खाणे निषेध आहे. * त्रयोदशीला वांगे खाणे वर्जित आहे. * चतुदर्शी, पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, अष्टमी, रविवार, श्राद्ध व उपासाच्या दिवशी तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्या व तांब्याच्या पात्रात जेवण करणे वर्ज्य आहे. * रविवारी आले खाऊ नये. * कार्तिक महिन्यात वांगी व मार्गशीर्ष महिन्यात मुळा खाणे वर्जित असते. * उभे राहून पाणी प्यायला नको. * जेवण संतापच्या भरात तयार केले असेल वा ते कुणी ओलांडून गेले असेल तरीही ते जेवण करायला नको. कारण ते अन्न राक्षसी असते. * ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल त्या लोकांनी रात्री दही व सातू खाऊ नये. हे अन्न रात्री ग्रहण केले तर मोक्षप्राप्ती होत नाही.