यंदा वर्षाच्या प्रारंभीच चंद्रग्रहण आल्याने शुभविवाहांना ब्रेक लागला आहे. मात्र 2010 च्या 15 मे 11 डिसेंबर 2010 पर्यंत खूप विवाह मुहूर्त आहे. त्यामुळे लोक आताच पुढील वर्षाच्या कुंडली जुळवून पाहाताना दिसत आहे.
2010 वर्षाचे विशेष म्हणजे मे ते सप्टेंबर या उन्हाळ्याच्या काळात विवाह मुहूर्त अधिक आहे. हिवाळ्यात मात्र विवाह मुहूर्त कमी आहे.
डिसेंबर 2009मध्ये 7, 8, 9, 10, 12, 13 तारखांना शुभ मुहूर्त होता. 13 डिसेंबर 09 ते 5 फेब्रुवारी 10 दरम्यान शुक्रास्त असल्याने विवाह मुहूर्त नाही.
त्यानंतर गुरू ग्रह अस्त असल्याने 16 फेब्रुवारी ते 20 मार्च दरमान अशुभ दिन आहे. 14 मार्च तसे 13 एप्रिलपर्यंत चित्र मास असल्याने विवाह मुहूर्त नाही. 15 एप्रिल ते 14 मेपर्यंत अधिकमास आहे. त्यामुळे या दरम्यान विवाह व शुभकार्य केले जात नाही.
जून- ऑगस्टदरम्यान 18 मुहुर्त
2010 च्या जून- ऑगस्ट दरम्यान 18-18 शुभ मुहूर्त आहे. हे मुहूर्त केवळ विवाहासाठीच नसून ते इतर शुभकार्यासाठी ही आहेत. 20 जानेवारी रोजी वसंत पंचमी आहे. 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान लग्न आहे. 16 मार्चला चैत्र नवरात्र सुरू होत असल्याने शुभ मुहुर्त आहे. 15, 28, 29, 31 मे हे शुभ मुहुर्त आहेत तर जूनमध्ये 1, 2, 3, 6, 8, 9, 16, 17, 19, 20, 21, 22, 23, 24, 27, 28, 29, 30 हे शुभ मुहुर्त आहे.